Subscribe Us

header ads

या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागल्या होत्या सर्वांच्या नजरा. #Gram Panchayat Election Results.

गडचांदूर:-#Gram Panchayat Election Results.
  राजूरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या गावात काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली असून इतिहासात पहिल्यांदाच शे.सं.ला खातेही खोलता आले नसून शुन्यावर समाधान मानावे लागले आहे.काँग्रेसने सरपंचासह 10 जागांवर विजय मिळवला तर उर्वरित 2 जागांवर भाजपने कब्जा मिळवला आहे.जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बिबी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसचे आशिष देरकर यांच्या नेतृत्वात तब्बल 10 जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले आहे. या ग्रा.पं.कडे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले होते हे मात्र विशेष.
      बिबी हे गाव शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांचे स्वगाव असल्याने शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला मानल्या जातो.मात्र मागील पंचवार्षिक मध्ये बिबी ग्रामपंचायतीत नागरिकांनी बदल घडवीत शेतकरी संघटनेला संधी न देता सत्तेची सूत्रे काँग्रेसच्या ताब्यात दिली.माजी सरपंच मंगलदास गेडाम व माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामे गावात करण्यात आली.नेमकी हीच बाजू काँग्रेससाठी जमेची ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे.यावेळी ही लढत शेतकरी संघटनेसाठी अस्तित्वाची झाल्यामुळे त्यांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली होती.काँग्रेसच्या सरपंच पदाच्या उमेदवार माधुरी टेकाम यांनी 1540 मते प्राप्त करून 461 मताधिक्यांनी शेतकरी संघटनेच्या सुनिता सिडाम हिचा पराभव केला.आशिष देरकर यांनी 610 मते प्राप्त करून 206 मताधिक्यांनी माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांचा पराभव केला.सोनाली आत्राम हिने 602 मते प्राप्त करून 191 मताधिक्यांनी वंदना कोडापे हिचा पराभव केला. भारती पिंपळकर 560 मते प्राप्त करून 109 मताधिक्याने माया खाडे हिचा पराभव केला.बंडू नैताम यांनी 415 मते प्राप्त करून 106 मताधिक्यांनी अजय पेंदोर यांचा पराभव केला.प्रणाली कोरांगे हिने 401 मते प्राप्त करून 73 मताधिक्याने पौर्णिमा मट्टे हिचा पराभव केला. गीता मिलमीले हिने 394 मते प्राप्त करून 62 मताधिक्याने संगीता उरकुडे हिचा पराभव केला.शिवराज बसवंते 269 मते प्राप्त करून मुकुंदा गुलबे यांचा 97 मताधिक्याने पराभव केला. राजू नन्नावरे यांनी 285 मते प्राप्त करून 126 मताधिक्यांनी सचिन सिडाम यांचा पराभव केला. सुरज कुळमेथे यांनी 243 मते प्राप्त करून 58 मताधिक्यांनी मतांनी गुलाब गेडाम यांचा पराभव केला.भाजपच्या दुर्गा पेंदोर हिने 218 मते प्राप्त करून सहा मताधिक्याने रंजूताई येरमे हिचा पराभव केला तर लीलाबाई चंद्रगिरी यांनी 215 मते प्राप्त करून 3 मतांच्या फरकाने प्रतीक्षा तुंगपल्ली हिचा पराभव केला.
                        हा सत्याचा विजय.
                           'आशिष देरकर'
चिखलगाव ते स्मार्ट व्हिलेज असा प्रवास केल्यानंतर गावाचा नावलौकिक वाढला.त्यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करून गावाला व मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.मात्र मतदानातून मतदारांनी विरोधकांना धडा. मात्र मतदानातून मतदारांनी विरोधकांना धडा शिकविला.शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात एकही उमेदवार निवडून न आल्याने शेवटी सत्याचा विजय झाला.
Gram Panchayat Election Results.
Bibī grā.Paṁ.Salaga dusaṟyāndā kām̐grēsacī sattā,śē.Saṁ.Itihāsāta pahilyāndāca śūn'yāvara.
                                  ---------//-------
                 
                    मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या