चंद्रपूर:-#First Marathi film #Korpanalivenews.
'हद्द' एक मर्यादा हा चित्रपट 15 आक्टोंबर रोजी फक्त 3 शो मध्ये स्थानीय प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाटयगृहात दाखविण्यात आला.या चित्रपटाला चंद्रपूरकरांनी जो प्रतिसाद दिला तो अविस्मरणीय व अवर्णनीय आहे.It is unforgettable and indescribable.
चंद्रपूरातील हॉस्पीटल वार्ड निवासी देवा बुरडकर आणी तुकूम निवासी प्रीतम खोब्रागडे या दोन फोटोग्राफर मित्रांनी 'एस.के.बॅनर' S.K.Banner खाली 'हद्द' एक मर्यादा,हा शिर्षक घेऊन पहिला मराठी चित्रपट First Marathi film तयार केला.ज्यामध्ये कलावंत,निर्माता,गायक,सगळेजण चंद्रपूर अथवा चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे.वारंवार मानवी वस्तीवर वन्य,प्राण्यांच्या आगमनाने सतत होत असलेली वाढ, या संदर्भात शासन व जनतेनी कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज असून याचा स्विकार जनतेने सुद्धा करावा,हा उद्देश चित्रपट निर्मिती मागचा होता.
यात प्रजेश घडसे,प्रशांत कक्कड,प्रकाश वाघमारे संजय रामटेके,के.राजू,अमित शास्त्रकार,धीरज गोगुलवार,शुभम भगत,मनोज तोकला,मनीष आंबेकर, शंकर दास,ज्योत्स्ना निमगडे,प्रदीप निमगडे,राजेंद्र वालदे,मृणाल कांबळे,अनुप वानखेडे,रमेश तांडी, गिरीश खोब्रागडे,प्रशिक वाहने,विनोद शेंडे,आबीद शेख,अफरोज़ पठाण,प्रकाश परमार(मुक्त वृत्तछाया चित्रकार)यांनी अप्रतिम कामगिरी केली.फक्त 3 शो आणि हाऊसफुल्ल Housefull गर्दी.प्रमोशन पूर्वी राष्ट्रगीत,फोर व्हिलर समोर कट-आउट,लोकांच्या लाईव्ह मुलाखती.या चित्रपटातील गीतकार, संगीतकार,गायक युवराज गोंगले असून 'बाबा येना परत एकदा' Baba come once again गीत अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
झुम्बा ग्रुप चंद्रपूरचे डॉ.धनंजय तावाडे यांनी तिकीट विक्रीसाठी भरीव मदत केली.निर्मात्यांनी प्रत्येक शो ला प्रत्येकी 3 लक्की ड्रॉ काढून प्रेक्षकांना भेट दिल्या. 'हद्द' एक मर्यादा चित्रपटाला चंद्रपूरकरांनी जे 'बेहद्द' प्रतिसाद दिला तो अमर्यादित असून चित्रपट निर्माते देवा व प्रितम यांनी सर्व जनतेचे अगदी मनापासून आभार मानले आहे.
Hadda' ēka maryādā citrapaṭālā candrapūrakarānnī dilā'bēhadda' pratisāda.
'Baba come once again'
-------//-------
0 टिप्पण्या