राजूरा:-#Dhanora News.
कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असल्यास त्यासाठी युवा वर्गाची मोठी साथ हवी असते तरच प्रत्येक व्यक्ती हा कोणतेही वाटचाल करण्यास यशस्वी होऊ शकते. असे मत माजी आमदार अॕड.संजय धोटे यांनी व्यक्त केले.ते राजूरा तालुक्यातील धानोरा येथे युथ फोरम ग्रुपतर्फे आयोजित 'युवा महोत्सव' कार्यक्रमात अध्यक्षस्थानारून बोलत होते.Youth Festival in Dhanora.

माजी आ.अँड.धोटे पुढे म्हणाले की,धानोरा गावात प्रत्येक वर्षी फोरम ग्रुपच्या माध्यमातून गावातील तसेच परिसरातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येत असते.हा गावकऱ्यांसाठी मोठे योगदान असून या सर्व कार्यक्रमासाठी सचिन बलकी व त्यांच्या सहकार्यांचे कार्य व योगदान महत्वाचे,असे मत व्यक्त केले.मंचावर उपस्थित ईतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले,



सदर कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.विरूर स्टेशनचे ठाणेदार राहूल चव्हाण यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजवत अनेक नागरिकांचे जीव वाचल्यबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेट वस्तू तसेच स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.विद्युत विभागाचे मकासरे,डॉ.अर्पित धोटे,गावच्या सरपंचा जोशना दुर्गे तसेच गावातील शारदा महिला मंडळाच्या भगनींचा सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल विद्यार्थी व विद्यार्थीनींचा तसेच जेष्ठ नागरिकांचा याप्रसंगी माजी आ.अँड.धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



मंचावर माजी आमदार अॕड.धोटे यांच्यासह विरूरचे ठाणेदार राहूल चव्हाण,भाजप तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,विरूर भाजप शहराध्यक्ष भीमराव पाला,भाजप जेष्ठ नेते सुरेश धोटे,ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष शंकर धनवलकर,किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बोबडे,डॉ.अर्पित धोटे,भाजप युवा मोर्चा तालुका महासचिव रवी बुरडकर,गावच्या सरपंचा जोशना दुर्गे, विद्युत विभागाचे मकासरे,प्रदीप पाला,सत्यपाल दुर्गे, पोलीस पाटील कैलास चहारे,उद्धव बलकी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्तविक युथ फोरम ग्रुपचे अध्यक्ष सचिन बलकी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय खामनकर,दीपक दोरखंडे, सोपान गिरसावाळे,प्रणय कारेकर,भुषण गौरकर आदींनी परिश्रम घेतले.

Honoring citizens in various fields for outstanding performance.
--------//-------
0 टिप्पण्या