Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांची मुंबईत 'काळी दिवाळी' साजरी. Hundreds of Teachers of the district celebrated 'Hundreds of teachers of the district celebrated 'Black Diwali' in Mumbai.

मुंबई:-#Teachers'Black Diwali'
  मागील पंधरा ते वीस वर्षांपासून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या राज्यातील जवळपास 60 हजारांच्यावर शिक्षकांना प्रत्येक शासनाने विविध अध्यादेश काढत आणि शाळांना लालीपाप दाखवत एकाप्रकारे थट्टाच केली आहे.शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे शंभर टक्के पगार,सेवा संरक्षण निवृत्ती वेतन,वैद्यकीय ध्येयपूर्ती व समान काम समान वेतन अशा विवीध मागण्यांना घेऊन मागील 17 दिवसांपासून राज्याचे हजारो शिक्षक "शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य" यांच्या बॅनरखाली मुंबई येथील आझाद मैदानावर महा आक्रोश धरणे आंदोनाला बसले आहे.
दिवाळी भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा व फार मोठा सण असून प्रत्येक जण हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करतात.मात्र राज्यातील हजारो शिक्षकांच्या हातात पैसाच नसल्याने आपल्या न्याय मागण्यांसाठी यांनी चटणी,भाकर खात आझाद मैदानावर काळी दिवाळी म्हणून साजरी केली.
अनेक शिक्षक,शिक्षिका आपल्या लहान मुलं,बाळं, परिवारासह आझाद मैदानावर बस्तान मांडून असल्याचे विदारक चित्र पाहून तरी शिक्षण विभागाला जाग येईल अशी अपेक्षा होती.मात्र अद्यापही शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही.असे असताना अखेर शिक्षकांची भाउबीज सुद्धा आझाद मैदानावरच साजरी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही,तोपर्यंत मैदान सोडणार नाही ! असा ठाम निर्धार जिल्ह्याभरातील शिक्षकांनी केल्याची माहिती असून जे शिक्षक बांधव आपल्या परिवारा समवेत घरी बसलेले आहे अशा सर्वांनी ताबडतोब मुंबई गाठावी, आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे,
कारण की मैदानावरती आपली उपस्थिती,हीच यशाची होऊ शकते,अन्यथा इतर राज्यातील शिक्षकांप्रमाणे आपल्यालाही शासन कंत्राटदारी पद्धतीने पगार घेतल्याशिवाय ठेवणार नाही.त्यामुळे आपल्या भविष्याची जाण ठेवत जिल्ह्याभरातील सर्व विनाअनुदानित,अंशत अनुदानित त्रुटी पात्र अघोषित शिक्षकांनी मुंबई गाठण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे हे.
Hundreds of teachers of the district celebrated 'Black Diwali' in Mumbai.
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
          मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या