Subscribe Us

header ads

लंडन : न थकणारी पाऊलं...! London: Tireless footsteps...

गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur #korpana.
         लंडन शहर चालत फिरण्यात जो आनंद होतो, त्याला शब्दांत मांडता येणार नाही.प्रसन्न,चैतन्यदायी आणि पावलोपावली वावरतांना नजरेला भुरळ घालणाऱ्या वास्तू या शहरात दिसतात.वातावरणातील गारवा मनात दाटून येतो.मी टेम्स नदीवरील Tower Bridge,Waterloo पुल,वेस्टमिनिस्टर पुल आदी भागात पायदळ फिरलो.Tower ब्रिज हा 1894 पासून आजतगायत डौलाने उभा आहे.येथील नदीवरील पूल बघून क्षणभर भारतातील नद्यांवरील पुलांची आठवण सहज झाली.काही अपवाद वगळता आपल्याकडील करोडो रुपयांच्या पुलांच्या बांधकामांचे नेमके वय काय असावे ? हे निश्र्चित सांगताच येत नाही.जे पूल स्वातंत्र्यपुर्व काळात भारतात ब्रिटीशांनी बांधलेले आहेत; ते मात्र अजूनही तसेच शाबूत आहेत.दुसरे महायुद्ध अगदी जवळून अनुभवलेला हा ब्रिज आहे.तेव्हाच्या तोफा व ऐतिहासिक बाबी आजही येथे संवर्धित आहेत.या ब्रिजखालून वाहणारी टेम्स नदी अगदी निर्मळतेने वाहनांना बघून जलसंर्वर्धनाची महती येथील येथील लोकमाणसात संस्कृतीसारखी रुजली असल्याचे जाणवते.येथील जहाजांची रेलचेल अगदी नयनरम्य ! त्याकाळी लंडन शहरातील पूर्व भागात व्यापार वाढीसाठी हा ब्रिज बांधला होता.कार्गो जहाजाने लंडन शहरात कापूस,साखर,चहा व इतर आवश्यक साहित्य नदीमार्गे येथूनच येत असे.आज हा परिसर जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. 
     मोठ्या जहाजांना टेम्स नदीतून जाता यावे,यासाठी स्टोकर्सद्वारे चक्क पूल उचलला जातो.आपल्याकडे रेल्वे फाटकावर रेल्वे गेल्यानंतर जसे फाटक उचलल्या जाते; अगदी तसेच सहजतेने इथे हा पुल उचलतात. टेम्स नदीपासून ४३ मीटर उंचीवरुन काचेतून खाली बघतांना दिसणारे चित्तथरारक विहंगम दृश्य मनाला तृप्त करते.या पुलालगत Fortress Palace Prision आहे.त्याच्या बाजूने चालत असताना लंडन ब्रिज,tower of London,मोठमोठी जहाजं हे सारं बघणे अगदी भव्यदिव्य आहे.विशेषतः टॉवर ब्रिजवर तीन मोठ्या बॉयलर्सद्वारे येथे वीज निर्मीती देखील करण्यात येते.खरे तर लंडनला येण्याअगोदर या झुमकेदार पुलाच्या छायाचित्रांनी मनावर गारुड केले होतेच; प्रत्यक्ष पाहताना भारतातील नद्यांवरील पुलांचे पुढील धोरणे आणि आव्हाने याचं चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
           मला लंडनच्या वेस्टमिनिस्टर भागात देखील पायदळ फिरायला खूप आवडले.टेम्स नदीलगत वेस्टमिननिस्टर आणि वॉटरलू पुलांच्या दरम्यान क्विन्स वाक Queen's Walk चालतांना पूलाखाली असलेली दुकाने-हाॅटेल्स,कार्यक्रम,कलाकृती,थिएटर आदींनी मन वेधून घेतले.तर दुसऱ्या बाजूने Vauxhall स्टेशनकडून पायवाटेने जातांना थोड्या अंतरावर 12 व्या शतकात जाती अंताची लढाई लढत अनुभवमंटप संकल्पनेतून लोकशाही मूल्य रुजवणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा दिसला.मी त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.जगातील प्रमुख शहरापैकी एक असणा-या विकसीत शहरात आपल्या संत परंपरेतील बसवेश्वरांच्या थोरवीचा अभिमान दाटून आला.The pride of Basaveshwara's thoravi in ​​the tradition of saints swelled. जगाला विचार देणा-या आपल्या संत-महंतांच्या भूमीचा आदर स्वाभिमान जागवणारा आहे.  
      पुढे चालत जातांना भिंतींवर बदाम हार्ट Heart काही जिवलगांची नावे लिहून दिसली.भारतात किल्ल्यांवर व महत्वाच्या ठिकाणी आपल्या दिव्य कलेचे प्रदर्शन व्हावे यासाठी लैला-मजनू जसे अजरामर रंगरंगोटी करतात; तसाच काहीसा प्रकार इथेही असावा असे क्षणभर वाटले. मात्र दोन पाऊले पुढे गेलो आणि समजले; ही “कोविड मेमोरियल भिंत” आहे.तेथे बदाम(हृदय)चित्र काढून कोरोना विषाणूने गमावलेल्या आप्तजनांची प्रिय आठवण म्हणून लोकांनी नावं लिहिली आहेत.
        गावगाड्यातून आल्याने पायदळ कितीही फिरलो तरी फारसे कष्ट जाणवत नाही,याची प्रचिती येथे फिरताना कमालीची प्रफुल्लित करत होती.डाव्या बाजूला संसदेच्या दैदिप्यमान वास्तूचा एक भाग पुढे दिसत होता. Westminster वेस्टमिनिस्टर पूलावर आले की,समोर युरोपातील सर्वात मोठे 'कॅन्टीलिव्हर्ड' निरीक्षण चाक झुला आहे.बालपणी मेला असला की,ज्याप्रमाणे झुला हा खालून उंचावर गोल-गोल फिरवायचा तसा हा विशाल झुला हळुवारपणे फिरत पर्यटकांना उंचीवरुन लंडन शहर बघण्याचा सुख:द अनुभव देतो.हा अनुभव पुढच्या काही दिवसांत भारतातून येथे शिक्षणासाठी आलेल्या मित्रमंडळीसह प्रत्यक्ष होईलच.लंडन डोळ्यात साठवण्यासाठी काही गोष्टी राखून ठेवाव्या लागतात,त्यातली ही एक गोष्ट. चालत असतांना संसद परिसरातील 'लंडन वाँच' बघता येते.या घड्याळीकडे बघतांना हे शहर कितीही पुढे असले तरी भारतीय वेळेपेक्षा तब्बल 4 तास 30 मीनीटे इतक्या फरकाने मागे आहे,याचे कुतूहल वाटले. 
         वेस्टमिनिस्टर भागातील संसदेलगत असलेल्या पुलावरील रस्त्याने चालताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पायवाट,त्याला लागून सायकल track आणि त्यालगत बसेस,दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीचा स्वतंत्र रस्ता आहे.अगदी शिस्तबद्ध.शिस्तीने नियमांचे काटेकोर पालन करत लोक चालताना दिसतात. सायकल track ला केवळ सायकली दिसतील.तो track रिकामा जरी असला तरी त्यावरुन कोणी पायदळ चालणार नाही किंवा अन्य वाहन नेणार नाही. प्रवासासाठी रस्त्यांची अगदी स्वतंत्र व सूटसूटीत केलेली आखणी आणि निटनेटकेपणा आनंदित करणारा आहे.रस्त्यावर अथवा पायवाटेने कुठेही खड्डा शोधून सापडणार नाही.अवैध पार्किंग कुठेच दिसणार नाही.Illegal parking will not be seen anywhere.
   पुढे चालत गेलो की संसद चौकासमोर जगभरातील प्रसिद्ध नामांकित राज्यकर्ते व सुधारकांचे पुतळे आहे. अगदी सुरुवातीला विंस्टन चर्चिल तर मधोमध महात्मा गांधी यांचा ऐतिहासिक पुतळा आहे.या परिसरात चहुबाजूने शेकडो वर्षांपासून डौलाने उभ्या असलेल्या मोठमोठ्या वास्तु,ऐतिहासिक पूतळे आदी बघता बघता आपण 7,8 कि.मी.पेक्षा अधिक चाललोय,हे सुद्धा विसरतो.डोळ्यांना मोहात पाडणारे हे शहर प्रत्येक क्षणाला रोमांचित करते.संसद चौक ते Trafalgar चौक हा रस्ता तर इतिहासाने भारावणारा आणि वास्तूशिल्पाने मनात कायमचे घर करणारा आहे.त्यावर नंतर विस्तृत लिहेलच. 
        मला या शहरात येऊन केवळ चार दिवस झाले. भारताबाहेरचं लंडन हे पहिले मेट्रो शहर बघतोय. जितके उत्तम तितके साठवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.इथे फिरतांना दररोज नवीन काही गवसत जातं. या शहरात प्रचंड प्रेरणा व स्फूर्ती आहे.शहराची रचना, करमणूकीचे ठिकठिकाणी बगीचे आणि इमारतींची भव्यता मनाला संपूर्ण व्यापून टाकते.त्याहीपेक्षा संसदेपुढील परिसरात आपल्या देशातील महात्मा गांधीचा येथे असणारा पुतळा विश्वशांतीचा, सत्याचा आग्रह अवलंबण्याचा विचार जागृत करते. 
             That's all for now.
    Adv.Deepak Chatap,(London)
                    तूर्तास एवढेच.
                 अॕड.दीपक चटप,
                28.9.2022 (लंडन)
London: Tireless footsteps...
Exerience of London Pathways by Adv.Deepak Chatap
                         -------//------
                       
                  मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या