Subscribe Us

header ads

मांसविक्री पुर्वी वैद्यकीय चाचणी व स्वच्छता अनिवार्य करा. Make medical testing and hygiene mandatory before sale of meat.

गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur#Gadchandur news.
      गडचांदूर शहरात नगरपरिषद हद्दीत काहींनी ठिकठिकाणी चिकन,मटन,मांसविक्रीची दुकाने थाटली आहे.यात काही परवाना धारक तर काही विनापरवाना राजरोसपणे दुकाने चालवित आहे.या दुकानांमध्ये मांसविक्री आधी आवश्यक वैद्यकीय चाचणी केली जात नाही,अनेक पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले तसेच मरणासन्न अवस्थेत असलेले बोकड,बकऱ्या, कोंबड्या कापून विक्री केली जात असल्याची चर्चा असून याठिकाणी स्वच्छतेचा सुद्धा मोठ्याप्रमाणात अभाव प्रकर्षाने जाणवतो.कोरोना संकटातून लोकांची सुटका होत असताना आता जनावरांना विविध रोगाने ग्रासले आहे.मासाहारी शौकिनांच्या आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून चिकन,मटन,माांसविक्री पुर्वी वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे.Chicken, mutton,meat must be medically tested before sale.
वास्तविक पाहता नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असताना ही मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहे.याच पार्श्वभूमीवर यासर्व मटन मांसविक्री दुकानदारांना कायदेशीर नोटीस देऊन अनिवार्य असलेली कार्यवाही करावी अशी तक्रार विजय ठाकरे यांच्यासह हरीदास मून,गौतम भसारकर यांनी थेट चंद्रपूर जिल्हा अन्न व औषध विभाग सह आयुक्त Chandrapur District Food and Drug Department Joint Commissioner यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आता संबंधित विभाग याविषयी काय कारवाई करतात याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.
Make medical testing and hygiene mandatory before sale of meat.
Complaint through a statement to the Joint Commissioner, Food and Drug Department, Chandrapur District.
                         -------//-------
          
             मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली
                मो.9049358699
                      9595638811 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या