Subscribe Us

header ads

चंद्रपूर:-MLA Jorgewar celebrated Diwali
       चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या राजमाता निवासस्थानी 'अम्माचा टिफीन'Amma's Tiffin परिवारासोबत दिवाळी साजरी केली.यावेळी स्नेहमीलन आणि आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले.यावेळी आ.जोरगेवार,अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार,डाॅ.तुषार साखरे,डाॅ.अरबाज़ पठाण, डॉ.रुचिता दास,डाॅ.दक्षता लाढे,प्रयोग शाळा तज्ञ सुनिल पागे,अधिपरिचारीका सुबिधा काकडे, आशा गेडाम आदींची उपस्थिती होती.
MLA Kishore Jorgewar celebrated Diwali with Amma's tiffin family.
       आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्माचा टिफीन हा उपक्रम राबविल्या जात असून या अंतर्गत गरजूंना घरपोच जेवनाचा टिफीन पोहचविला जात आहे.अम्माचा टिफीन उपक्रम आता विस्तारित होत असून अम्माचा टिफीन हा मोठा परिवार बनला आहे.दरम्यान आ.जोरगेवारांनी दिवाळी सण साजरा करण्यासाठी अम्माचा टिफिनच्या परिवाराला घरी आमंत्रित केले होते.यावेळी सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच निशुक्ल औषधोपचार करण्यात आला.यावेळी आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात आ.जोरगेवारांनी अम्माचा टिफीन परिवारासह भोजन करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मनात असलेली संकल्पना पूर्ण करता आली याचा आनंद आहे.अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांनी अम्माचा टिफीन या उपक्रमाला भेट देत कौतूक केले. हा उपक्रम यशस्वी होत आहे यात स्वयंपाक करणाऱ्यांपासून डब्बे घरोघरी पोहचविण्याचे अविरत काम करणाऱ्यांचाही मोठा वाटा आहे.आज 300 ते 400 लोकांचा हा परिवार झाला आहे.या परिवाराचा प्रमुख म्हणून केवळ जेवनच पोहचवून चालणार नाही.तूमच्या आरोग्याची काळजी ही मला घ्यायची आहे. यासाठी महिन्यातून एकदा आपण आरोग्य शिबीर घेणार आहो.पूढे हा परिवार आणखी मोठा होणार याचीही मला आशा आहे. तूमच्या सोबत दिवाळी साजरी करत असताना आनंद होत आहे,सोबतच त्यांना आधार नाही त्यांचा आधार बनू शकलो याचे समाधानही वाटत असल्याचे प्रतिपादन आ.जोरगेवार यांनी केले.
    या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वदंना हातगावकर,बंगाली समाज महिला शहर संघटीका सविता दंडारे,युवती प्रमुख भाग्यश्री हांडे,आशा देशमुख,सायली येरणे,अस्मिता डोनारकर, प्रेमिला बावणे,आशु फुलझेले,अल्का मेश्राम,जमिला मेश्राम,सरोज चांदेकर,वैशाली रामटेके,अनीता झाडे, कविता निखारे,रुबीना शेख,कौसर खान,वंदना हजारे, वैशाली मद्दीवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
       मो.नं.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या