भद्रावती:-#Crime Piport.
मुलाची तब्बेत बरी नसल्याने रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून रागाच्या भरात 55 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या केली.सदर घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव येथे घडली असून यामध्ये घनशाम सहारे याचा मृत्यू तर 24 वर्षीय मुलगा शक्ती सहारे हा गंभीर जखमी झाला.याप्रकरणी आरोपी तुकाराम नारायण भोयर 55 याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.Bhadravati Police.
आरोपीच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याने घनशामकडे दुचाकीची मागणी केली असता घनशामने ती दिली नाही,यावरून दोघात वाद झाला.हा वाद घनशामचा मुलगा शक्ती याने सोडवला.दरम्यान आरोपी घरी गेला व धारदार शस्त्र आणून त्याने घनशामवर हल्ला चढवला.पित्याच्या मदतीला शक्ती धावला असता आरोपीने त्याच्यावर सुद्धा हल्ला केला. या घटनेत घनशाम सहारे याचा मृत्यू झाला.जखमी शक्तीला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
A 55-year-old man was killed with a sharp weapon
-------//------
0 टिप्पण्या