Subscribe Us

header ads

चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी "विनय गौडा" New Collector of Chandrapur "Vinay Gowda"

चंद्रपूर:-#Korpanalive#Chandrspur #Gadchandur.
       राज्यात 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली झाली आहे.त्यांची नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.त्यांच्या जागी सातारा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी "विनय गौडा" हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे. Chief Executive Officer of Satara Zilla Parishad Vinay Gowda is the new Collector of Chandrapur.भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) असलेले विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना,अतिवृष्टी या संकटात जि.प.ने उत्कृष्ट काम केल्या.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले होते.ZP पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने 21 मार्चपासून जि.प.चे प्रशासक म्हणून ते काम पाहत होते.प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कामांना प्राधान्य त्यांनी दिले. त्या आधी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिड वर्ष काम पाहिले होते.गौडा यांनी नंदुरबार जि.प.च्या माध्यमातून घरकुल योजनेवर भर दिला होता.योजना प्रभावीपणे राबविणारी नंदुरबार जि.प.राज्यात अव्वल ठरली होती.New Collector of Chandrapur "Vinay Gowda"
                          ----------//--------
                            
                        मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या