गडचांदूर:-Liquor shop NOC#Korpanalive news.
गडचांदूर पासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेल्या हरदोना खुर्द ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सचिव रज्जू धोरात यांनी ग्रामसभेत घरकुल व इतर विकास कामांच्या नावाखाली तसेच हळदी कुंकवाच्या एका कार्यक्रमात महिलांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.आणि त्या स्वाक्षऱ्या मुंबई येथील एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्यासाठी वापरल्या.काही दिवसानंतर दारू दुकान येत असल्याची चर्चा ऐकून गावातीत काही तरुणांनी हरदोना ग्रामपंचायतला विचारले मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. माहिती अधिकाराचा वापर करून मिळालेल्या माहिती वरून खरे चित्र समोर आले.विविध विकास कामांच्या नावाने तत्कालीन सचिव आणि सरपंच व सदस्यांनी चक्क दारू दुकानाला ना-हरकत देऊन आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर ग्रामवासी आक्रमक झाले.अंधारात ठेवून स्थलांतरित दारू दुकानाचा ठराव,दिलेली NOC रद्द करावी यासाठी लढा उभारला.शेवटी त्या संघर्षपूर्ण लढ्याला यश प्राप्त झाले ? असून 15 आॕक्टोंबर रोजी आयोजित ग्रामसभेत तो ठराव रद्द करण्यात आला.dārū dukānālā dilēlē NOC akhēra grāmasabhēta radda?
याविषयी सविस्तर असे की,हरदोना (खु) ग्रामपंचायत येथे 23 मार्च 2022 रोजी सरपंच शंकर टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.तत्कालीन ग्रामपंचायत सचिव रज्जू थोरात यांनी सर्वप्रथम विषय कार्यवाही बुकावर उपस्थित गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.यानंतर विषयांना सुरूवात करण्यात आली.यातील विषय क्रं.2 म्हणजे मुंबई येथील भालचंद्र भाटकर यांचे दारू दुकान हरदोना ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.मात्र असा कोणताच विषय त्यावेळी ठेवण्यात आला नव्हता.ग्रामपंचायत सरपंच,सचिव किंवा कोणत्याही सदस्यांना याची पूर्व माहिती दिली नव्हती,घरकुला विषयीची ही आमसभा होती.यांनी गुप्तपणे व धोक्याने आमच्या सह्यांचा वापर स्थलांतरित दारू दुकानासाठी केल्याचे आरोप करत आमची फसवणूक करून दारू दुकानाला दिलेले ना-हरकत NOC रद्द करावे यासाठी सलग दोन, तीन महिन्यापासून ग्रामवासीयांनी एल्गार पुकारला होता.
जिल्हाधिकारी चंद्रपूर,वने,सांस्कृतीक कार्यक्रम तथा मत्स्य व्यवसाय राज्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार सुभाष धोटे,अधिक्षक दारूबंदी विभाग,उपविभागिय अधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी,सचिव ग्रा.पं.हरदोना,आमदार सुभाष धोटे,माजी आमदार अॕड.संजय धोटे व इतर संबंधितांना निवेदन देण्यात आले होते.राजूरा पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन महिला,पुरूष ग्रामवासीयांनी केले होते.आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती BDO यांची भेट घेऊन सदर प्रकरणी सविस्तर माहिती दिली अशा विविध प्रकारचा संघर्ष करून अखेर यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले असून ग्रामसभेच्या माध्यमातून त्या दारू दुकानाची NOC रद्द करण्यात आली आहे ? सकाळी 11 वाजता सुरू झालेली सदर ग्रामसभा अनेक घडामोडी घडत रात्री उशीरापर्यंत वादळी ठरली.सर्व कामे बाजूला सारून 400 च्या जवळपास महिला,पुरुषांनी यात आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. यासंदर्भात अधिकृतपणे कागदपत्र प्राप्त झाले नसून पुढे याप्रकरणात काय घडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Finally, the NOC given to that liquor shop was canceled in the Gram Sabha?
-------//------
0 टिप्पण्या