सिंदेवाही:-#Korpanalive news.#Chandrapur #Gadchandur.
सिंदेवाही तालुक्यातील मौजा नलेश्वर या गावी राहणाऱ्या तानाबाई सावसाकडे वयवर्षे अदाजे 65 या महिलेची 3 आक्टोंबर रोजी हत्या झाली होती.ती हत्या घरातीलच व्यक्तींनी केल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना हिने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे दिली होती.घटनेची गंभीरता लक्षात घेता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी गाठले.
नलेश्वर या गावातून मृत महिलेची मुलगी नामे वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरूवातीला या दोघीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होत्या.मात्र सखोल चौकशीनंतर मुलगी वंदना व वाहिनी चंद्रकला या दोघींनी शेत जमिनीच्या वादात झालेल्या भांडणातून आईचा तोंड व नाक दाबून Pressing the mouth and nose ठार मारल्याची कबूली दिली.याची माहिती गावात होवू नये यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गावा बाहेर जमिनीमध्ये मृतदेह पुरवल्याचे यांनी सांगितले.सदर प्रकरणी कलम 302, 201,506,34भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे.सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे करीत आहे.
Pōṭacyā mulīnē kēlī janmadātyā ā'īcī hatyā!
------//------
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699
9595630811
0 टिप्पण्या