Subscribe Us

header ads

प्रा.जहीर सैय्यद समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.Prof. Zahir sayyad 'Samaj Bhushan' Puraskarane sanmanit.

गडचांदूर:-#Award News.
      बल्लारपूर येथील शहीद अशफाकुल्लाह खान मल्टीपर्पझ सोसायटी तर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करून आपली छाप सोडणाऱ्या विशेष व्यक्तींना सद्भावना पुरस्कार,समाज भूषण व विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून शाल,श्रीफळ,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असतात.
     याच पार्श्वभूमीवर सलग 955 दिवसांपासून दररोज न चुकता भोजन दान करणाऱ्या हैद्राबाद येथील हाजी मोहम्मद हनीफ तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक,रक्तमित्र सुभाष तेटवार यांना सद्भावना पुरस्काराने तर बल्लारपूर क्षेत्रात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या जय भीम बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सदस्यांना तसेच 2022 सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने सन्मानित 'पल्याड' या चित्रपटातील बाल कलाकार 'रुचित निनावे' यांना विषेश पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यातील नवउद्योजक इंजि.वासिफ हमीद शेख व कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवणाऱ्या 'प्रा.जहीर सैय्यद' यांना 'समाज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      प्रा.जहीर मागील 22 वर्षापासून गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून दरवर्षी व सुट्टीच्या दिवशी ते मुलांसाठी इंग्रजी बेसिक ग्रामर English Basic Grammar चे मोफत अतिरिक्त वर्ग घेतात त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विवीध क्षेत्रात यश संपादन केले आहे. तसेच ते 'जहीर व्हॉईस' Jahir Voice या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे व्हिडिओ बनवतात.तसेच शैक्षणिक कार्या बरोबरच प्रा.जहीर हे सामाजिक Social कार्यात सुध्दा अग्रेसर असतात.यांच्या याच कार्याची दखल घेऊन शहीद अशफाकुल्लाह मल्टीपर्पझ सोसायटीतर्फे यांना यंदाचा समाज भूषण पुरस्कार दिला गेला आहे.यापुर्वी याच वर्षी यांना जेसीआय JCI राजूरा रॉयल्सतर्फे 'आदर्श शिक्षक पुरस्कार' Ideal Teacher Award ने सन्मानीत करण्यात आले हे मात्र विशेष.
      यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष डॉ.आ.श.अडबाले, उपाध्यक्ष तू.ता.पुंजेकर,सचिव ना.श.बोबडे,सहसचिव विनायक उरकुडे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रा.धर्मराज काळे,पर्यवेक्षक गाडगे आणी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करत प्रा.जहीर यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
Prof.Zahir sayyad 'Samaj Bhushan' Puraskarane Damnably.
                         --------//-------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,95956830811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या