Subscribe Us

header ads

काँग्रेस,शेतकरी संघटना प्रणीत 'ग्रामविकास युवा आघाडी' चा दनदनीत 'विजय' Congres, Shetakari sanghatna prani gramavikas yuva aghadi cha danadanit vijay.

गडचांदूर:-Gram Panchayat Election #Korpanalivenews.
       कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले.यात उप्परवाही ग्रामपंचायत येथे काँग्रेसच्या सरपंचासह 4 सदस्य तसेच शेतकरी संघटना उपसरपंच पदाचे दावेदार सह अन्य 2 सदस्य असे एकूण 8 सदस्य निवडून आले. सदर निवडणूक यांनी ग्रामविकास युवा आघाडी म्हणून लढली होती.उप्परवाही ग्रामपंचायत येथील एकुण सदस्य संख्या 9 आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली.राजूरा विधानसभा काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तसेच उत्कृष्ट संसद पटू माजी आमदार अॕड.वामनराव चटप यांचे मार्गदर्शन व विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या अनुभवातून ग्रामविकास युवा आघाडीने घवघवीत यश संपादन केले.
          काँग्रेसच्या सौ.गिताताई साईनाथ सिडाम ह्या जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या.तर ज्योती सचीन चिकराम,सौ.पंचफुला बापूजी काकडे,सौ.मनीशा अनिल मेश्राम व शंकर भाऊराव गुरूकुंटवार असे 5 तर शेतकरी संघटनेचे गोवींद गेडाम,अनील कौरासे व प्रतिभाताई संतोष आत्राम असे एकूण 3 सदस्य विजयी झाले.सदर निवडणूक कामगार नेते विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात विजयक्रांती संघटनेने विजय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न करत एकही उमेदवार पडणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. बबन आत्राम महासचिव विजयक्रांती कामगार संघटना,अभय जवादे युवा नेता काँग्रेस,नरसिंह एमुलवार,दिलीप ठमके,मानसिंघ पानचाल,बालू काकडे,सुधाकर वाडकी,अशीष पिंपळकर,धनराज पिंपळशेंडे,मुकेश पोटे,प्रवीण डाखरे,दिनेश काले, सागर ठमके इत्यादींनी परिश्रम घेतले.निवडणूकीत यश संपादन केल्याने काँग्रेस,शेतकरी संघटना व विजयक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून जल्लोष केला.
A resounding 'victory' of Gram Vikas Yuva Aghadi led by Congress,Shetkari Sanghatna.
                    👇👇👇👇
सरपंच:- गीता साईनाथ सिडाम 501 लिड 89.
वार्ड क्रमांक 1. 
गोविंद गेडाम 323 लिड 98. 
ज्योति चिकराम 274 लिड 49.
पंचफूला काकडे 329 लिड 104.
वार्ड क्रमांक 2. 
मनीषा मेश्राम 185 लिड 64.
अनिल कौरासे 254 लिड 133. 
वार्ड क्रमांक 3.
शंकर गुरुकुण्टवार 152 लिड 27.
प्रतिभा आत्राम 179 लिड 54. 
कोमल बल्की 126 लिड 1. 
           सर्व विजयी उमेंदवारांचे अभिनंदन.
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या