Subscribe Us

header ads

ऐवढ्या तक्रारी,शासनप्रशासन मात्र 'सायलेंट मोडवरच' ! So many complaints,but the administration is on 'silent mode'!

गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur #Gadchandur #Korpana.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी व आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर यांनी विविध कामात केलेला हयगयपणा,पक्षपाती धोरण,कर्तव्यास कसूर तसेच लाखोंचे घनकचरा व्यवस्थापन ठेका आणि ओपनस्पेस वरील ग्रीनजिम कामातील केलेल्या लाखोंच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप करत सदर मुद्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास यांच्यावर तात्काळ निलंबनाची करवाई करावी अशी मागणी वजा विनंती नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी सविस्तर मुद्यांसह एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरसेवक डोहे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे सविस्तर असे की,मुख्याधिकारी डॉ.शेळकी व आरोग्य विभाग प्रमुख पिदुरकर,हे गेल्या 4 वर्षांपासून गडचांदूर नगरिषदेत कार्यरत आहे.यांच्याकडे कोरपना, गोंडपिपरी,जिवती नगरपंचायतींचा सुद्धा अतरिक्त कारभार आहे.असे असताना जवळपास सर्वच ठिकाणावरून यांच्यावर कित्येकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले.वरिष्ठांकडे यांच्या बरेचश्या तक्रारी सुद्धा झाल्या. परंतू यांच्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही ! दीड वर्षापूर्वी येथील भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी घनकचरा व्यवस्थान ठेक्यातील भ्रष्ट्राचाराची चौकशी करून यांच्या निलंबनाची मागणी घेऊन चक्क 9 दिवस आमरण उपोषण केले.तेव्हा त्रिसदस्यीय समिती नेमून यात काही आढळल्यास कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.मात्र सदर प्रकरण थंडबसत्यात असून आजतागायत कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याचे संबंधितांकडून कळते.
नगरपरिषदेने नागपूर येथील एका 'अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' Urbon Inviro West Managment pvt.Ltd. Nagpur नामक कंपनीला 1 कोटीची कामे दिली.मात्र कमी मनुष्यबळ व कमी घंटा गाड्या लावून काम सुरू आहे.घनकचरा कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम आणि आरोग्य सभापती सौ.अश्विनी कांबळे यांना दिली असता आरोग्य सभापती सौ.काबळे यांनी 25 सप्टेंबर रोजी अचानकपणे सकाळी 5,30 वाजता न.प.ला जावून पाहणी केली तर घनकचरा व्यवस्थापनाचे खरे चित्र समोर आले.त्यावेळी केवळ 16 मजुर व 4 घंटा गाड्या मोक्यावर उपस्थित होत्या.मग याप्रकरणी पुढे काय काय घडले,हे जगजाहीरच आहे.मुख्य म्हणजे ठेकेदाराला प्रतिमाह 22 हजार आणि मजुरांना 6 ते 8 हजार देवून त्यांची पिळवणूक केली जात आहे.
   (नगरसेवक डोहे यांनी केलेल्या मागण्या)
                     👇👇👇
1 एप्रिल 2022 पासून घनकचरा व्यवस्थापनचे बिल देण्यात आले मात्र प्रत्यक्षात 13 एप्रिल पासून कामाला सुरूवात झाली.हजेरी रजिस्टर तपासावे व कर्मचार्‍यांकडून यासंदर्भात चौकशी करावी.कमी मनुष्यबळ व नाममात्र कपात करून दिलेल्या बिल संदर्भात हजेरी रजिस्टर तपासावे व किती लोकांच्या PF,EPF ची रक्कम भरण्यात आली याची चौकशी करावी.अंदाजपत्रकानुसार कर्मचाऱ्याचे वेतन ठेकेदाराला देण्यात येते परंतु यांना केवळ 6 ते 8 हजार दिले जात असल्याची सत्यता कर्मचाऱ्यांकडून जाणून घ्यावे.वेतन वेळवर देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात 2 दिवस कामबंद आंदोलन केले.त्या 2 दिवसाचे वेतन मजुरांकडून कपात केले परंतु न.प. कडून कपात न करता पिदुरकर यांनी ठेकेदाराला बिल दिले.यासंदर्भात चौकशी करावी.ठेकेदाराचे व न. प.चे हजेरी रजिस्टर तपासावे.मजुरांचे PF,EPF भरला अथवा नाही याबाबत चौकशी करावी.शहरात सुरू असलेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरणातील झाडे लावण्यात विलंबची चौकशी करावी.मागील अडीच वर्षापासून सुरू असलेल्या पाणी टाकी बांधकामात दिरंगाई का ? याची चौकशी करावी.अग्निशमन वाहन शेडचे काम मागील एक वर्षा पूर्वी मंजूर असून यामध्ये दिरंगाई का ? याची चौकशी करावी.अशी मागणी नगरसेवक डोहे यांनी केली असून पालकमंत्री,वने, सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच गडचांदूर न.प.मुख्याधिकारी, नगराध्यक्षा,आरोग्य सभापती यांनाही निवेदन देण्यात आले आहे.आता यासंदर्भात काय घडते याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.
So many complaints,but the administration is on 'silent mode'!
Gadchandur N.P.Suspend the then Chief Executive and Head of Health Department.
                               -------//------
                            
                        मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या