Subscribe Us

header ads

सांघिक वृत्ती जोपासत खेळा 'भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे' Cultivate team spirit and play 'District President Devrao Bhongle'

वरोरा:-volleyball tournament
सर्वांनी सांघिक वृत्ती जोपासत खेळ खेळावा,सर्व स्पर्धकांना येथील विजयासह यापुढे राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धेसाठी माझ्या शुभेच्छा असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.ते वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोकशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील स्व.मनोहरभाऊ पाटील क्रिडा परिसरात आयोजित 'WSF चषक'(WSF Cup)महाराष्ट्र राज्य ज्युनियर गट आंतरविभागीय व्हाॅलीबॉल स्पर्धेच्या उदघाटनीय कार्यक्रमात बोलत होते. Attendance of BJP District President Devrao Bhongle at the inaugural program of inter-departmental volleyball tournament going on at Varora.

याप्रसंगी नागपूर विभाग विरूद्ध मुंबई विभाग,असा मुलींचा उदघाटनीय सामना पार पडला.या सामन्याचा त्यांनी प्रमुख पाहुण्यांसह आनंद घेतला.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उत्साही स्पर्धक येथे आले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,माजी नगरसेविका सौ.सुनिता काकडे,श्रीकांत पाटील, गजाजन जिवतोडे,अनिल साखरीया,दिलीप घोरपडे, विनोद चौधरी,प्रविण सोदारी,बब्लू सातपुते,अमित चवले,संदिप ऊईके यांच्यासह खेळाडू मित्रमैत्रिणीची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
Cultivate team spirit and play 'District President Devrao Bhongle'
                                       ------//------
                                 
                               मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या