Subscribe Us

header ads

सदैव,भाऊ म्हणून आशाताईंच्या पाठीशी उभा राहील. 'आ.जोरगेवार' Will always stand by Asha Worker's side as a brother MLA.Jorgewar.

चंद्रपूर:-#Asha Workers Bhaubij.
        समाजात आशा वर्कर यांचे विशेष स्थान आहे. शासनाचे काम त्या प्रमाणीकपणे करत आहे.त्यांचे कार्य कौतुकास्पद राहिले.त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ते आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत आहे.विशेषतः कोरोना काळात त्यांनी दिलेली धाडसी सेवा समाज कधीही विसरणार नाही.घरची कामे उरकून कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागते.कधी लसीकरणाची ड्युटी तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी त्या उत्तम रित्या पार पाडत आहे.असे असतानाही त्यांच्या वेतनासह ईतर अनेक अडचणींची मला जाण असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत आज भाऊबीज निमित्त औक्षण करून तुम्ही भाऊ बहिणीचे अतूट नाते जपले.दरवर्षी न विसरता आपण रक्षाबंधन,भाऊबीज हे भाऊ बहिणीचे सण माझ्यासोबत साजरे करता. "एक लोकप्रतिनिधी आणि या ताईंचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील'' असे भावनिक मत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. The work of ASHA workers is commendable.
      भाऊबीज निमित्त आशा वर्कर यांनी कार्यालयात येऊन आमदार किशोर जोरगेवार यांना औक्षण करत ओवाळणी करून भाऊबीज साजरी केली. यावेळी आमदार जोरगेवार यांनीही भाऊ म्हणून त्यांना आर्शिवाद देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे,आशा देशमुख,करणसिंह बैस,नकुल वासमवार यांच्यासह आशाताईंची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
Will always stand by Asha Worker's side as a brother- MIa.Kishore Jorgewar.
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595639811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या