चंद्रपूर:-#Bus Station News.
चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्थानकाच्या वाहनतळास सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी 4 कोटी 52 लक्ष रू.इतका निधी मंजूर झाला असून राज्याचे वने व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.The result of the efforts of Guardian Minister Sudhir Mungantiwar. राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापत्य अभियांत्रीकी विभागाचे उप महाव्यवस्थापक यांनी 31 ऑक्टोंबर 2022 च्या पत्रान्वये सदर रकमेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर शहरातील बस स्थानकाच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणाच्या कामासाठी 16 कोटी रू.निधी सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला.

या बस स्थाकाच्या वाहनतळाचे सिमेंटीकरणासाठी निधी मंजूरीच्या प्रस्तावाचा त्यांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून यासाठी 4 कोटी 52 लक्ष रू.निधी मंजूर केला आहे.सदर बस स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
That...! 4 crore 52 lakhs sanctioned for cementing of bus station parking lot.
The result of the efforts of Guardian Minister Sudhir Mungantiwar.
-------//-------
0 टिप्पण्या