Subscribe Us

header ads

मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी चंद्रपूरातील 5 खेळाडू पात्र.5 athletes from Chandrapur qualified for Mini Olympics.

चंद्रपूर:-@Mini Olympics.
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या वतीने आयोजित 91वी राज्यस्तरीय बॉक्सिंग State level boxing अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 24 ते 29 नोव्हेंबर पर्यंत अकोला येथे सुरू असून या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच For the first time in the history of the district 12 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत यातील 5 खेळाडूं मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र व चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन,यांच्या कारकीर्दीत हे खेळाडू सराव करतात.त्यांच्या अथक प्रयत्नांना यावेळी यश आले.5 खेळाडू प्रथमच जानेवारी महिन्यात होणार्‍या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या 'मिनी ऑलम्पिक' क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील.बॉक्सिंग क्रीडा क्षेत्राला एक नवीन दिशा या खेळाडूंनी मिळवून दिली व चंद्रपूर जिल्ह्याचे बॉक्सिंग क्षेत्रात नावलौकिक केले.5 athletes from Chandrapur qualified for Mini Olympics.
दीपक केराम 60 की.,सुरेश निर्मल 63.5 की.,वरूण जैन 75 की.,अरविंद गजकेश्वर 86 की.,खुशाल मांदाळे 92 अशी पात्र ठरलेल्या खेळाडूंची नावे असून यांच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना अध्यक्ष डॉ.बी प्रेमचंद,महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना महासचिव डॉ.राकेश तिवारी,भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना अध्यक्ष डॉ.मिलिंद रायपुरे,राजू गुंडावार,डॉ.अमीत प्रेमचंद,विवेकानंद महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक कु.संगीता बांबोडे, प्रशांत निकोडे,अमर भांडारवार,कोमल वाकडे,आशिष तामगाडगे,अमीत शास्त्रकार,कु.प्रीती बोरकर, आलोका बिश्वास,लता इंदुरकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत पदकाच्या सुरूवातीसह राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातून निर्माण होतील अशी शाश्वती राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे यांनी दिली.
For the first time in the history of the district.
5 athletes from Chandrapur qualified for Mini Olympics.
                          ------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या