गडचांदूर:-@New Borewell.
आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानीक निधी अंतर्गत 24 नोव्हेंबर रोजी कोरपना येथील प्रभाग क्रमांक 5, माता मंदीर जवळ नवीन सार्वजनिक बोअरवेलचे उदघाटन करण्यात आले.cdcc बँकेचे संचालक, काँग्रेस जिल्हा सचिव विजय बावणे यांच्या हस्ते पूजन करून बोअरवेलच्या खोदकामाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक एजाज शेख,डॉ.राय हरीदास झाडे,मुज्जु कादरी,शंकर हंसकर,पारधी बाबू,सिमा धारणकर, पिंकी घाटे,विद्या हंसकर,इंदिरा चामाटे,पुष्पा हंसकर, सपना रॉय यांची उपस्थिती होती.या प्रभागाचे नगरसेवक निसार शेख यांनी विजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करून सदर बोअरवेलसाठी मंजूरी मिळवल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी विजय बावणे व नगरसेवक निसार शेख यांचे आभार मानले आहे.

New Borewell in Ward No.5.
--------//--------
0 टिप्पण्या