गडचांदूर:-@eye camp.
औद्योगिक नगरी नांदा येथे लॉयन्स सेंटर सेवाग्राम, वर्धा,लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकाली,महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर,स्वामी विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा,कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर व गुरुदेव सेवा मंडळ कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने नांदा येथील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत 19 नोव्हेंबर रोजी विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण,मोतीबिंद शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये औद्योगिक परिसरातील 182 नागरिकांची सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.यातील 46 रूग्णांना कृत्रिम भिंगारोपण,मोतीबिंद शस्त्रक्रियेसाठी बसद्वारे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला नेण्यात आले.सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात येणार असून 12 रूग्णांना 22 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे.58 patients will undergo surgery.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद महाराज यांच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून शिबिराचे विधिवत उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाळासाहेब चौधरी,उदघाटक ह.भ. प्र.डाखरे महाराज,विशेष प्रमुख अतिथी लॉयन्स क्लब व महावीर इंटरनॅशनलचे पदाधिकारी पूनम तिवारी, हरीश मुथा,देवेंद्र वर्मा,डॉ.स्वप्नेश चांदेकर,स्मार्ट व्हिलेज बीबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर,निराधार समिती अध्यक्ष उमेश राजुरकर,शैलेश लोखंडे,नांदा ग्रामपंचायत सदस्या आशा खासरे,प्रिया काळे.प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक मारोती जमदाडे,मारोती बुडे, मनोज शेरकी,माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर राऊत,रूपा पानघाटे,सुवर्णा झाडे आदींची मंचावर उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.आशिष देरकर यांनी प्रास्ताविक केले. कोरपना तालुक्यामध्ये नेत्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारचे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्वामी विवेकानंद मंडळ नांदाचे अध्यक्ष पुरुषोत्तम निब्रड,हारुण सिद्दिकी,अरविंद इंगोले,गणेश लोंढे,राजू मोहितकर,महेश राऊत,प्रवीण पोटवडे,सचिन बोढाले, विवेक खनके,हरीश खंडाळे,शोएब शेख,रतन ठाकरे, राजू काळे,शंकर राऊत,सोनू बेग,अश्विन कस्तुरे,प्रफुल बोढाले,स्वप्निल कस्तुरे,साईनाथ इटणकर,अशोक क्षीरसागर या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले.शिबिरात तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची योग्य ती व्यवस्था युवक मित्रांनी केली. परिसरातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे.सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

नांदा येथील एजाज़ अल्ताफ़ शेख,चेतन सुभाष आत्राम,शुभम इटनकर या तीनही होतकरू युवकांच्या मेहनत,जिद्द,चिकाटी व कौशल्याच्या बळावर त्यांची नुकतीच भारतीय सैन्यामध्ये निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.नितेश मालेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले विविध संघटनांनी व प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर घेण्यासाठी सहकार्य लाभल्याने अभय मुनोत यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.

-------//-------
0 टिप्पण्या