Subscribe Us

header ads

पोलिस अहवालानुसार दोषींवर होणार कारवाई.According to the police report, action will be taken against the culprits.

चंद्रपूर:-@Railway bridge accident.
  बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर 27 नोव्हेंबर रोजी पादचारी पूल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाले.या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत FIR नोंदविण्यात आली असून चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी रेल्वे स्टेशनला भेट दिल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशीही पालकमंत्र्यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनला भेट देवून रेल्वे प्रशासनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,रेल्वे प्रशासनाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे,वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,नॅशनल रेल्वे युझर्स कौन्सिल सदस्य अजय दुबे,महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे,ब्रिजभूषण पाझारे, चंद्रपूर महानगर भाजपा महामंत्री,माजी नगराध्यक्ष बल्लारपूर हरीश शर्मा,माजी उपमहापौर राहुल पावडे, लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैशाली शिंदे,रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे,वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णा पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी,बल्लारपूर स्टेशन प्रबंधक ए.यु.खान,निलेश खरवडे,सूरज पेदुलवार,प्रज्वलंत कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेची काय सुविधा आहे,याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा करून माहिती घेतली.स्टेशनवरील सध्याचे दोन्ही पुल तातडीने दुरूस्त करून घेण्याचे तसेच नवीन पादचारी पुलाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून तेथे प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करावी,असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. तसेच बल्लारपूर व चंद्रपूर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये 10 crore each for modernization of Ballarpur and Chandrapur railway stations.आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर CSR फंडमधून बॅटरी ऑपरेटेड कार देण्यात येईल.या गाड्यांवर जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळांचे 'क्यूआर कोड’ विकसीत करावे.जेणेकरून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याची माहिती उपलब्ध होईल. स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्याच्या संख्येत वाढ करून ती 40 वरून 60 करण्यात येईल.आंध्राप्रदेशाकडून येणाऱ्या गाड्यासाठी बल्लारपूर हे महाराष्ट्रातील पहिलेच महत्वाचे रेल्वेस्थानक असून या ठिकाणी रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा.बल्लारपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे नियोजित प्लॅटफॉर्म वेळेवर बदलत असल्याबाबत प्रवाश्यांची तक्रार आहे.प्लॅटफॉर्म क्रमांकाबाबत वेळेवर घोषणा होत असल्याने नागरिकांची धावपळ होते.ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व येणाऱ्या गाडीचा प्लॅटफॉर्म निश्चित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
     चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधीत रेल्वेचे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे.चंद्रपूरबाबत विशेष बैठक घेवून ते आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.तसेच या बैठकीचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले.याप्रसंगी रेल्वे प्रशासनातर्फे गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रूपये व किरकोळ दुखापतग्रस्तांना 50 हजार रूपये रोख अदा करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.बैठकीला जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Ballarpur railway bridge accident. According to the police report,action will be taken against the culprits.

10 crore each for modernization of Ballarpur and Chandrapur railway stations.
                            ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या