मुंबई :-#Korpanalivenews.
स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफ़जल खानाची कबरीजवळ झालेले अतिक्रमण व त्या माध्यमातून अफ़जल खानाचे उदात्तीकरण आम्ही कदापि खपवून घेणार नाही. म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी कारवाई करून अतिक्रमण पाडले अशी प्रतिक्रिया राज्याचे वन,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.महाराजांना राज्याच्या स्वराज्य हितवादी सरकारकडून हा मानाचा मुजरा Mujra of honor आहे,असेही मुनगंटीवार म्हणाले.

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे.शौर्य,धैर्य आणि महाराजांची चतुराई यासाठी ही लढाई अजरामर ठरली.10 नोव्हेंबर 1659 हा तो दिवस. आपण तो शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो.महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफ़जल खानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट खानाचा शिताफीने वध करून संपविले.संख्येने दुप्पट-तिप्पट असलेल्या त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.परंतू 29 जुलै 1953 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफ़जल खानाची कबर तयार करण्यात आली आणि एका संस्थेला लीजवर ही जागा देण्यात आली होती.

तेव्हापासून शिवप्रेमी जनतेत असंतोष होता.यासाठी अनेकदा आंदोलने झाली,तक्रारी झाल्या अगदी प्रकरण कोर्टापर्यंत गेले.दरम्यान सन 2008 मध्ये सदर जागेची मुदत संपली. त्यानंतरही अतिक्रमण हटविण्या संदर्भात कारवाई झाली नव्हती होती.अखेर शिवप्रताप दिनाचा मुहुर्त राज्य सरकारने पाहून आज ही कारवाई केली.राज्य सरकारला या कारवाईचे समाधान असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात यापुढे स्वराज्यद्रोही कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही,असा इशारा देखील त्यांनी दिला.

Afzal Khan would not tolerate the exaltation of his views.
--------//------
0 टिप्पण्या