भद्रावती:-@Strong Reaction....
पतंजली ग्रुपचे सर्वेसर्वा,योगगुरू,स्वामी बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.विवीध संघटना व राजकीय पातळीवर बाबा रामदेव यांच्या त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर 29 नोव्हेंबर रोजी भद्रावती येथे 'आम आदमी पार्टी' AAP तर्फे बाबा रामदेव यांचा निषेध करण्यात आला.Aam Aadmi Party Bhadravati condemns Baba Ramdev's disastrous statement on women

बाबा रामदेव जेव्हा महिलांवर आपत्ती जनक वक्तव्य करत होते त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पत्नी सौ.अमृता फडणवीस हे सुद्धा त्या कार्यक्रमात उपस्थित होते.मात्र त्यांनी बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा विरोध केला नाही.त्या वक्तव्याचा राज्यभरात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे.'मुर्दाबाद,मुर्दाबाद,ढोंगी बाबा मुर्दाबाद,महिलाओ के सन्मान में आम आदमी पार्टी मैदान मे' असे नारे देत आपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.सुरज शहा यांच्या नेतृत्वात व सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित सदर निषेध आंदोलनात सुमित हस्तक, विनीत निमसरकर,राजकुमार चट्टे,प्रफुल शेलार, आशिष तांडेकर,विजय सपकाळ,अनील कुमार सराताज शेख,सचिन पाटील,मंगेश खंडाळे,केशव पचारे,श्याम पिंपळकर,रितेश नगराळे,राजेश नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर,प्रदीप लोखंडे,चेतन खोब्रागडे, संजय सातपुते,डोरी स्वामी,घनश्याम गेडाम यांच्या सह आपचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
Strong Reaction....
Aam Aadmi Party Bhadravati condemns Baba Ramdev's disastrous statement on women.
------//------
0 टिप्पण्या