Subscribe Us

header ads

तर..!कोथळा काढल्याशिवाय राहत नाही,सत्ता गेली चुलीत. 'बच्चू कडू आक्रमक' Bacchu kadu addressing party worker melava in amravati.

अमरावती:-Political news.
     रवी राणा ravi rana यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू bacchu kadu यांनी 1 नोव्हेंबर रोजी अमरावती येथे जोरदार मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात शेरो-शायरीने केली.प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही. प्रहार prahar मध्ये दहा वार करण्याची ताकद आहे, तो बाजी आहे,तानाजी आहे,वार करण्याची क्षमता आमच्यात आहे.मैदानात असेल तर मैदानात, तलवारीत आले तर तलवारीत आणि सेवेत आले तर सवेत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही.आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर 'कोथळा काढल्याशिवाय राहत नाही,विनाकारण तोंड मारू नका,सत्ता गेली चुलीत,आम्हाला काही पर्वा नाही' असा इशारा देत गुवाहटीला Guwahati जाणारे आमदार म्हणजे पैसे खाणारे आमदार असे आरोप वारंवार केले जात आहे.हे आरोप मोडून काढताना बच्चू कडू Bacchu Kadu यांनी याआधी महाराष्ट्रात तसेच देशात कशी बंडखोरी Rebel झाली,कसे उठाव झाले,याचे दाखले मेळाव्याला संबोधित करताना दिले.
    'जली को आग खते है और बुझी को राख कहते है और बारूद जो निकलता है उसे प्रहार कहते है' अशी आपल्या भाषणाची सुरूवात बच्चू कडू यांनी केली.हा काही सत्तेचा पाठींबा किंवा शक्तीप्रदर्शनाचा विषय नाही,आमचा पक्ष काही मोठा नाही,त्यामुळे आमच्या मेळाव्याला नियोजन नाही,आम्ही सैनिकांसारखं जगतो,फार विचार करत नाही,गर्दीमध्ये दर्दी आहेत, उगाच का बच्चू कडू 4 वेळा निवडून येतोय ? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.आम्ही दिवस पाहिला नाही,रात्र पहिली नाही,आम्ही लोकांसाठी धावत होतो,काम करत होतो.गेल्या 25 वर्षात राज्यातील एकही कोपरा सोडला नाही,इतका महाराष्ट्र फिरलो.तेव्हा कुठे दिव्यांगांना सत्तेत स्थान मिळाले असे बच्चू भाऊंनी आवर्जून सांगितले.यावेळी त्यांनी राणांबरोबरचा विषय संपल्याचाही स्पष्ट केला.
    आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केला जात आहे.आम्ही गुवाहाटीला का गेलो ? माझ्याकडे मंत्रिपद होता,मंत्रिपद सोडून कोण जातो का ? पण जिथे तत्त्व येतं तिथे काही निर्णय घ्यावे लागतात,असं बच्चू कडू यांनी सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही काँग्रेसला जळतं घर म्हटले होते. पण जेव्हा वंचितांना न्याय द्यायची वेळ आली,तेव्हा ते काँग्रेससोबत सत्तेत गेले.गोरगरीबांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात,असे ते सांगितले. 'आपल्याकडे गरीबांची मुलगी पळून गेली तर पळून गेली म्हणतात आणि श्रीमंताची पोरगी पळाली तर तिने लव्ह मॅरेज केलं असे म्हटलं जातं.असा बच्चू कडू सांगताच एकच खसखस पिकली.आमचा लहान पक्ष आहे.छोटे है लेकिन दिलदार आहे.नाव बच्चू जरू असेल,आडनाव कडू असलं तरी एवढा गोड आहे.कितीही खाल्लं तरी शूगर नाही,म्हणून हे परिवर्तन चालत राहतं,आम्ही गुवाहटीला गेलो,यात फार काही वेगळं केलं नाही,असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं.
Bacchu kadu addressing party worker melava in amravati
                           -------//------
      मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या