Subscribe Us

header ads

खा.राहुल गांधी सोबत बावणे दाम्पत्यानी मिळवले "कदम से कदम" Bawane couple achieved "Kadam Se Kadam" along with Mr.Rahul Gandhi.

कोरपना:-@Bharat Jodo Yatra.
      काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात असून यात मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते सहभागी होत असून देशभरात भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.जिद्द,चिकाटी,संयम,निर्भयता, अशा कित्येक गुणांचा समावेश असलेली ''सर्व समावेशक'' ही भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra प्रेम,बंधुत्वचा संदेश घेऊन,माणसं-माणसांना जोडत निघाली आहे.अनेक आव्हाने,अडथळे असताना प्रचंड ऊर्जा,उत्साह घेऊन राहूल गांधी नावाचा हा निर्भय ''लोकशाही विचार प्रवाह'' सतत पुढे जात आहे.
   या प्रवाहात आम्ही सुद्धा सामिल आहो असे म्हणत इतरांसह कोरपना नगरीचे सर्वेसर्वा,सीडीसीसी cdcc बँक संचालक,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा सचिव विजयराव बावणे,कोरपना नगरपंचायत नगराध्यक्षा सौ.नंदाताई बावणे,हे बावणे दाम्पत्यानी वाशिम येथे खा.राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सामील होवून यांनी खा.राहुल गांधी सोबत "कदम से कदम" मिळवले आहे.या दरम्यान विजयराव बावणे यांनी खा.गांधी सोबत विविध मुद्यांवर चर्चा केली
   यांच्यासोबत कोरपना काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे,काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर,कोरपना नगरपंचायत उपनगराध्यक्ष ईस्माईल शेख,सभापती मनोहर चन्ने,सभापती आरीफा बेगम,नगरसेवक निसार शेख,देविका पंधरे,जोस्तना खोबरकर,माजी नगरसेविका उज्वला धारनकर,संगीता पंधरे,प्रशांत लोडे,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मोबीन बेग यांनीही यात्रेत सहभागी होऊन खा.राहुल गांधी सोबत पैदल चालण्याचा आनंद घेतला.खा.राहुल गांधी यांच्या "भारत जोडी यात्रे" ला मिळत असलेला अप्रतिम प्रतिसाद पाहता भविष्यात काँग्रेस पार्टीलाख पुन्हा नवीन उभारी देणारी ठरेल का हा ? येणारा काळच ठरवेल.
Bawane couple achieved "Kadam Se Kadam" along with Mr.Rahul Gandhi.
                            ------//-------
  मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या