Subscribe Us

header ads

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ बाईक रॅली...!Bike rally in support of Bharat Jodo Yatra.

गडचांदूर:-@Bharat Jodo Yatra.
     काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या Bharat Jodo Yatra.समर्थनार्थ जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर,राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गडचांदूर शहरात बाईक रॅली Bike rally काढण्यात आली.येथील रावी पेट्रोल पंपापासून सुरूवात झालेल्या रॅलीचा शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत गांधी चौक येथे समारोप झाला. त्याठिकाणी छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले.
Gadchandur City Congress Committee Bike rally in support of Bharat Jodo Yatra.
        कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी MP Rahul Gandhi यांच्या नेतृत्वात सुरू आहे.सध्या या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू असून यात्रेच्या वातावरण निर्मिसाठी इतर ठिकाणी पाठोपाठ गडचांदूर येथे काँग्रेसच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी बाईक रॅली Bike rally काढण्यात आली.रैली दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी शहर अक्षरशः दणाणून गेले, शहरात सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.Bike rally in support of Bharat Jodo Yatra.
   देशात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठ्यासंख्येत वाढ झाली असून महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.असे असताना मात्र केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय राज्य घटनेमुळे देशात लोकशाही, धर्मनिरपेक्षता,समाजवाद टिकवून ठेवता आले.परंतू सध्या याला धोका निर्माण झाल्याचे चित्र असून यातून देशातील एकतेला धोका निर्माण होऊ शकते ? सध्या देशात तानाशाही व्यवस्था निर्माण झाली आहे, देशातील निवडक प्रस्थापितांकडे संपत्ती केंद्रीत करण्याचा कार्यक्रम मोठ्याप्रमाणात राबविला जात असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी गांधी चौक येथे आयोजित सभेत केली.आमदार सुभाष धोटे यांनीही भारत जोडो यात्रे संदर्भात मार्गदर्शन करताना वर्तमान सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.सदर रॅलीत तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
MP Balu Dhanorkar and MLA Subhash Dhote present.
                           -------//------
  मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या