गडचांदूर:-#Blood Donation Camp.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचांदूर नगरतर्फे सेवा सप्ताह अंतर्गत गडचांदूर ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात पोलीस कर्मचारी,डॉक्टर सह जवळपास 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्वांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.Blood Donation Camp.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचांदूर नगरचे संस्थापक शशिकांत राजकारणे,कृष्ण वायकर,धीरज सेलोकर, परशुराम,ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर संजय गाठे,डॉक्टर प्रवीण येरमे,परिचारीकांनी सहयोग केला. मान्यवरांच्या हस्ते यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वेळी भाजपचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या चमूने रक्त संकलन केले.

'Blood Donation Camp' by Rashtriya Swayamsevak Sangh Gadchandur Nagar
-------//--------
0 टिप्पण्या