गडचांदूर:-@Cancer.
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे 22 नोव्हेंबर रोजी कॅन्सर अवरनेस प्रोग्राम Cancer Awareness Program या विषयावर पुरुष,स्त्री,मुले,मुली यांना होणारे कॅन्सर सारखे आजार व त्यावर उपाय बाबत शालेय तंबाखू व धूम्रपान नियंत्रण समिती गडचांदूर व टाटा ट्रस्ट कॅन्सर टीम चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी.आर.काळे तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ.आशिष बारब्दे,डॉ.सुरज साळुंके,डॉ.अर्पणा चालूरकर, गोपमवार मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी कॅन्सर विषयक मार्गदर्शन केले व कॅन्सर विषयक पीपीटी PPT दाखवण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मेहरकुरे,प्रा. सुरपाम,प्रा.भगत,शशिकांत चन्ने,सुभाष टेकाम तसेच आर्ट,सायन्स,एमसीवीसीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची प्रामुख्याने उपस्थिती होती.संचालन प्रा. मेहरकुरे,प्रास्ताविक प्राचार्य डी.आर.काळे व आभार प्रा.सुरपाम यांनी व्यक्त केले.

Cancer Awareness Program.
--------//-------
0 टिप्पण्या