गडचांदूर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयतर्फे 26 नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' Constitution Day साजरा करण्यात आला.या निमित्ताने 'संविधान सन्मान रॅली' Constitution Honor Rally चे आयोजन करण्यात आले.सदर रॅली महात्मा फुले चौक,गांधी चौक,संविधान चौक,बसस्थानक मार्गे भ्रमण करीत विद्यालयात पोहोचली.दरम्यान 'संविधान दिन चिरायू हो,भारत माता की जय' इत्यादी नारे देत असलेल्या विद्यार्थींनी यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

संविधान दिना निमित्य विद्यालयातील सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले.मुख्याध्यापक धर्मराज काळे अध्यक्षस्थानी होते.तर कोरपना पं.स. शिक्षण विस्तार अधिकारी सचिन कुमार मालवी, पर्यवेक्षक संजय गाडगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व माधवी यांनी प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून समजावून दिले.तसेच गाडगे यांनी संविधानाची आवश्यकता सांगितली.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी या देशाची वास्तविक परिस्थिती व संविधानाची आवश्यकता उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.संविधानातील अनेक कलमांचा मागावा घेत प्रास्ताविकेतील मतितार्थ उलगडण्याचा प्रयत्न केला. तसेच संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्याची जाण प्रत्येकाने अंगी बाळगावी असे मत व्यक्त केले.यावेळी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन बावनकर सर यांनी केले.प्रास्ताविक कु.ज्योती चटप,संचालन सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार राजेश मांढरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Constitution Honor Rally'
------//-------
0 टिप्पण्या