कोरपना:-#Korpanalivenews.
कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर होते तर गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,डॉ.आकाश जीवने,डॉ.घाटे,भाजप नेता संदीप शेरकी यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती.
हंसराज भय्या हे सर्वसामान्य जनतेचे कैवारी म्हणून ओळखले जातात.यांनी अनेक शेतकऱ्यांना शेतीचा मोबादला मिळवून दिला,प्रकल्प ग्रस्तांना नोकरी मिळवून देण्यासाठी भय्याचा सिंहाचा वाटा आहे, भय्यांनी अनेक विकास कामांना चालना दिली असे मत हिवरकर यांनी व्यक्त केले.इतर मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले.पद्माकर गेडाम,मारोती मडावी, सुरेंद्र पावडे,रोशन कोडापे,सुरज दळांजे,चंद्रभान अलाम,मयुर मेकाले,सुधाकर कव्वलवार,दिवाकर गेडाम,सावंत पेंदोर,अनिल गेडाम,अमोल मडावी सह इतर भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थित होती.संचालन पद्माकर गेडाम तर आभार मारोती मडावी यांनी व्यक्त केले.

Distribution of fruits to patients on the birthday of Hansraj (Bhaiyya)Ahir.
------//-------
0 टिप्पण्या