Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतोय चित्रपट 'पल्याड' The film 'Palayad' is becoming an inspiration to students.

गडचांदूर:-@Film Palyad.
    गडचांदूर सावित्रीबाई फुले विद्यालयातील शिक्षिका भुवनेश्वरी गोपमवार वर्ग 5 वी ते 8 विच्या विद्यार्थ्यांना 'पल्याड' चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली.या चित्रपटात शिक्षण घेण्यासाठी शंभू नामक बाल कलाकाराचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.हा संघर्ष पाहून अनेक विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व प्रेरणा निर्माण होत असून अंधश्रद्धेचे निर्मूलन करून विज्ञान युगाकडे नेऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. सदर शाळेच्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी पल्याड चित्रपट बघण्याचा आनंद घेतला.चित्रपट उत्कृष्ट व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत शिक्षिका गोपमवार यांनी प्राचार्य धर्मराज काळे यांच्याकडे व्यक्त केले. 
   तसेच सहाय्यक शिक्षक सि.एम.किन्नाके,मरस्कोल्हे सर,जिवन आडे सर,आत्राम सर यांच्या सहकार्याने चित्रपट बघण्याचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाला.सर्वांनी चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा व ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात आले असून मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आभार मानले.
The film 'Palayad' is becoming an inspiration to students.
                            ------//------
  मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.904958699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या