Subscribe Us

header ads

मित्र परिवारांनी केली 'आनंदवना' ची सहल. Friends made a trip to 'Anandavan'..!

गडचांदूर:-@Anandavan trip.
    दिवसामागून दिवस जातात,उरतात फक्त आठवणी. मात्र याच आठवणी जगण्याचा विशेष आधार असतात ! जीवन जगत असताना आपले शालेय जीवन, आयुष्यातील प्रेरणा असतात.नेमका त्याच जुन्या आठवणींना गडचांदूर येथील काही मित्र मंडळीने आपल्या स्नेह भावना एकमेकांच्या भेटीतून उजाळा दिल्या.निमित्त होते आनंदवनाची सहल.गेल्या दोन वर्ष कोरोनामूळे जग थांबले होते.दररोज भेटुन गप्पा मारणारी मित्र मंडळी,सुख दु:खात सोबत असणारे नातेवाईक,हे सर्व एकमेकांपासून दुरावले होते.या महाभयंकर विषाणूमुळे कोणीच कोणाला प्रत्यक्षपणे भेटत नव्हते.आता मात्र पूर्वीप्रमाणेच सर्व सुरळीत सुरू झाले आहे.याच पार्श्वभूमीवर जग पुर्वी सारखे आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेले असताना आदित्य मंगरूळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत एक दिवसीय सहलीचा प्रस्ताव ठेवला.सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील समाजसेवक 'बाबा आमटे' यांनी कुष्ठ रोगीयांसाठी निर्माण केलेले 'आनंदवन' येथील सहल आयोजित केली.
  यावेळी मित्र आदित्य मंगरूळकर,आशिष तुरानकर, मयूर एकरे,यश डाखरे,संजय ताजने,विजय रागीट, मेघराज एकरे,भूषण रागीट,पवन ताजने,सुरज खुसपुरे, प्रवीण मुसळे यांनी एकमेकांसोबत त्या शालेय जीवनातील फूललेल्या मैत्रिला उजाळा देऊन आनंदवनात एक दिवस साजरा केला.
Friends made a trip to 'Anandavan'..!
                             ------//-------
  मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या