Subscribe Us

header ads

''सात दिवसाच्या आत'' मागण्या पूर्ण करा...! Fulfill the demands within seven days.

चंद्रपूर:-#Korpanalivenews.

       धारिवाल कंपनीत रोजगार,शेतकऱ्यांची नुकसान भरपाई,जलप्रदूषण,वाहतुकीचे अडथळे याबाबत सात दिवसांच्या आत सुधारणा व अमलबजावणी करण्याचा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल व्यवस्थापनाला दिला आहे.7 नोव्हेंबर रोजी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विविध समस्यांवर चर्चा केली.Fulfill the demands within seven days.!चंद्रपूर येथील धारिवाल इन्फास्ट्रक्चर लि. ताडालीच्या परिसरातील नाल्यातील प्रदूषित पाण्यामुळे जनावरांवर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या शेतात दूषित पाणी गेल्याने 2016 पासून तर आजपर्यंत पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.याबाबत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी दिल्या.MP Balu Dhanorkar gave instructions for compensation.
     जिल्हाधिकारी विनय गौंडा,आमदार सौ.प्रतिभाताई  धानोरकर,तहसीलदार चंद्रपूर,तहसीलदार कोरपना, तालुकाध्यक्ष श्याम थेरे,नंदू धानोरकर,रोशन रामटेके इतरांची उपस्थिती होती.या सोबतच खुटाळा येथील निवासी अतिक्रमितांना हटविण्याच्या नोटीसाबाबत पुनर्विचार करून तोडगा काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना खासदार धानोरकर यांनी केल्या.तसेच कोरपना तालुक्यातील विशेषतः पिंपळगाव,नांदा,बीबी,बाखर्डी,लखमापूर,कवठाळा येथील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली.याबाबत पुन्हा सर्वेक्षण करून न्याय देण्याच्या सूचना खासदार धानोरकर व जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांनी तहसीलदार कोरपना यांना दिल्या.कोरपना तालुक्यात 8 हजार 665 बाधित क्षेत्रत 13 हजार 224 शेतकऱ्यांना 13 कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी शासनाकडून प्राप्त झाल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.मात्र चुकीच्या सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शसनास आल्याने या ठिकाणी पुनःसर्वेक्षनाचे आदेश देण्यात आले आहे.
                           ------//------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या