गडचांदूर:-#Farmers_news.
गडचांदूर अंमलनाला विश्रामगृह येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमलनाला व पकडीगुडम मध्यम प्रकल्प कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक पार पडली.या प्रकल्पाद्वारे लाभक्षेत्र असलेल्या गावातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू व चण्याचे उत्पादन घेण्यासाठी या प्रकल्पाचे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थिती पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांना दिले.तसेच प्रकल्पाच्या कालव्याची देखभाल उत्तमरीत्या करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कालव्याचे पाणी उपयोगात आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले.तसेच कालवे सल्लागार समितीद्वारे आपल्या क्षेत्रातील अमलनाला,पकडीगुड्डम डॅमच्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन उपयोगी पाण्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.Give Amlanala and Pakgigudam water to farmers for Rabi season

सदर बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी सय्यद यांनी अमलनाला आणि पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणी साठ्याची माहिती दिली.अमनाला मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 22.24 द.ल.घ.मी.उपलब्ध असून यामध्ये अंदाजे बाष्पीभवन 5.56 द.ल.घ.मी.,बिगर सिंचन पाणी आरक्षण 3.34 द.ल.घ.मी.सध्या सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा 12.19 द.ल.घ.मी.मुबलक प्रमाणात आहे. तसेच पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 19.80 द.ल.घ.मी.उपलब्ध असून यामध्ये अंदाजे बाष्पीभवन 2.95 द.ल.घ.मी. बिगर सिंचन पाणी आरक्षण 2.51द.ल.घ.मी.सध्या सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा 6.34 द.ल.घ.मी.मुबलक प्रमाणात आहे.या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण लाभक्षेत्रातील गावे 34 आहे.प्रकल्पाद्वारे रब्बी हंगामासाठी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवणे शक्य आहे.अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंतांनी दिली.

यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता वर्मा, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे,जेष्ठ नेते नानाजी आदे,उपविभागीय कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी एस.पी.जामई,तालुका कृषी अधिकारी व्ही. के.मकपल्ले,टी.जी.आडे,सहायक गटविकास अधिकारी ताजने,कमलाकर भेंडे,बोरावार,व्यंकटेश मुंडे,जंगू चीलराम,अशोक चांदेकर,शेखर परचाके, श्रीरंग पोतराजे,शुभम उरकुंडे,राहुल जूनगरे,रोशन कांडेकर,पुरुषोत्तम पिंपळशेंडे,पाणी वापर संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सदस्य यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सैय्यद तर संचालन व आभार पवार यांनी केले.
#Give Amlanala and Pakdiguddam water to farmers for Rabi season.
#MLA Subhash Dhote's instructions to officials of irrigation department.
-------//-------
0 टिप्पण्या