भद्रावती:-#Bhadravati news.
ग्रामीण रंगभूमीला मोठा इतिहास आहे.विदर्भातील झाडीपट्टीत रंगभूमीचे कार्य मोठे असून अनेक कलावंत जन्माला आले व त्यांनी राज्य पातळीवर आपली छाप सोडली मात्र या ग्रामीण रंगभूमीचे जतन करणे गरजेचे असून त्यासाठी गावागावात नाटकाचे प्रयोग होणे गरजेचे,असे मत आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.त्या ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी तालुक्यातील चालबर्डी येथील लोक विद्यालयाच्या प्रांगणात आधार बचत गटाच्या वतीने गायत्री रंगभूमी,सिंदेवाही,वडसा निर्मित ''अंधारलेल्या वाटा'' या नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.It is necessary to preserve the rural theatre.MLA'Pratibha Dhanorkar'

"अंधारलेल्या वाटा'' या प्रयोगाचे उदघाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.मंचावर यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर,ठाणेदार गोपाल भारती,घोडपेठचे सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, भास्कर ताजने,चालबर्डीच्या सरपंचा प्रियंका सोयाम, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष योगेश मत्ते,गणेश नागपुरे,सचिन जोगी, देऊबाबा पारसे,श्रीधर ताजणे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ग्रामीण भागातील नव्या पिढीमध्ये नाटकाची आवड निर्माण व्हावी यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.संचालन नंदू ताजने तर आभार संजय वाघाडे यांनी व्यक्त केले.कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी पुंडलीक जोगी,सतीश मालेकर,भूपेंद्र ताजणे,पंढरी नेहारे, विलास सोननटक्के,विलास जोगी,विश्वास मालेकर, हितेश कुमार बावणे,मारूती राऊत,निलेश नागपुरे, दीपक माटे सह इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Gramin rangabhumiche jatan karane garajeche.MLA 'Pratibha dhanorakar.'
--------//-------
0 टिप्पण्या