चंद्रपूर:-@"Hadda" Ek Maryada.
चंद्रपूरातील पहिला मराठी,डिजीटल चित्रपट "हद्द" एक मर्यादा या चित्रपट निर्माते, सहकलावंत यांनी स्थानिय देवाडा येथील "डेबु सावली" वृद्धाश्रमात परिवारासह छोटेखानी "कृतज्ञता सोहळा" कार्यक्रम आयोजित करून वयोवृध्दांचे आशिर्वाद घेतले. 'Hadda' Eka Mariya Gratitude Ceremony Delights Elderly at 'Debu Sawli' Nursing Home.चंद्रपूर शहरातील "देवा बुरडकर" व "प्रितम खोब्रागडे" यांच्या एस.के.चित्रपट S.K.Movie निर्मीतीतर्फे "हद्द" एक मर्यादा या मराठी चित्रपटाची निर्मीती करण्यात आली."Hadda" Ek Maryada Digital Marathi Movie Production by SK Films.

या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर वचनपूर्तीसाठी सदर सोहळा आयोजित करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर,गाडगेबाबा व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिनंदन करून प्रथमसत्र कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.योगनृत्य संस्थापक गोपाल मुंधडा,संस्थाध्यक्ष सुभाष शिंदे,सेवानिवृत्त पो.उ.नि.ईश्वर खोब्रागडे,देवा बुरडकर,प्रितम खोब्रागडे,धनंजय तावाडे,आकाश घोडमारे यांची मंचावर उपस्थिती होती.उपस्थीत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सुभाष शिंदे यांनी चित्रपटासंदर्भात मनोगत व्यक्त केले.संचालन धनंजय तावाडे यांचे होते.हा चित्रपट मनाला भिडला असे मत गोपाल मुंधडा यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. यावेळी वृध्दाश्रमातील वृद्धांनी मागणी केलेल्या भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.संचालन धनंजय तावाडे यंनी केले.Elderly at Debu Sawli Old Age Home overwhelmed.
यानंतर दुसऱ्या सत्राची सुरूवात करण्यात आली. या चित्रपटाला हवी असेल ती मदत करण्याचे अभिवचन डॉ.गुलवाडे यांनी यावेळी दिले. वृद्धाश्रमातील वयोवृध्दांसोबत सुग्रास जेवणाचा आनंद घेतला.डॉ.गुलवाडे स्वतः प्रेमाणे जेवन वाढत असल्याचे पाहून वयोवृध्द अक्षरशः भारावून गेल्याचे पहायला मिळाले.संचालन सौ.ज्योत्सना निमगडे यांनी केले.Hadda" Ek Maryada.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री-किसन पेंदोर विलास डोंगे,विनोद शेंडे,मनोज तोकला,नरेश बुरडकर,अमित शास्त्रकार,रमेश तांडी,आबीद शेख,अफरोज पठाण, प्रकाश परमार,बंडू आवळे,शुभम भगत,प्रदीप निमगडे, नंदू सोनारकर,सौ.मृणाल कांबळे,सौ.किरण प्रितम खोब्रागडे,सौ.शुभांगी देवीदास बुरडकर्,सौ.सरोज नरेश बुरडकर,सौ.प्रेमिला ईश्वर खोब्रागडे,सुलोचना रमेश बुरडकर,सौ.सोनाली संजय खोब्रागडे व वयोवृद्ध गणमान्य आणि देवाडा ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
'Hadda' eka maryada ceremony of thanksgiving.

Elderly at Debu Sawli Old Age Home overwhelmed.
--------//-------
0 टिप्पण्या