Subscribe Us

header ads

चार दिवसात पार्सल नाही गेलं तर...If the parcel does not go within four days.

मुंबई:-@Signals of Maharashtra Bandh.
          राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले.त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालावर हल्लाबोल केला आहे.तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेतही Signals of Maharashtra Bandh दिले आहे.दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.Uddhav Thackeray's 'Maharashtra Bandh' signal.
    उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.येत्या दोन चार दिवसात राज्यपालांचा विषय तडीस न्यावा लागेल.जे महाराष्ट्र प्रेमी,फुले प्रेमी, आंबडेकर प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आहेत.त्यांना उभे राहावे लागेल.शिवाजी महाराज नसते तर कोश्यारी कुठे असते.सावित्रीबाई फुले नसत्या तर महिला शिक्षणाचं काय झाला असता ? याचा साधा भान राज्यपालांना राहिला नाही.हे आता अती झालं, ज्यांना आगा-पिछा नाही असे लोक राज्यपाल पदावर बसवलं गेलं असा हल्ला त्यांनी चढवला.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. मिंधे सरकार आल्यापासून उद्योग बाहेर जात आहेत.हे कमी की काय आता राज्यपाल.! मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही.ही व्यक्ती कोश्यारी महाराष्ट्राचा अवमान करत आहे.Insulting Maharashtra.
     त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली,मुंबई आणि ठाणेकरांवर टीका केली,आता आमचे दैवत शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. "बाप हा बाप असतो" तो जुना असतो का ? त्यामुळे बेताल विधाने करणाऱ्या राज्यपालांना हटवला पाहिजे,अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.जे राज्यपाल येतात ते विचारधारा घेऊन येतात.कोश्यारी जे म्हणाले ती भाजपची विचारधारा आहे का ? सर्वांनी एकत्र यावा, पार्टी बाजूला ठेवा,राज्याच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन बोलले पाहिजे.दोन चार दिवस वाट पाहू,हे पार्सल परत नाही गेलं तर आम्हाला काही तरी करावा लागेल.महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.आमच्याकडे मुख्यमंत्री "पैचान कोन" सारखे आहेत.उपमुख्यमंत्रीच बोलत आहे.मुख्यमंत्र्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला.
If the parcel does not go within four days...
Uddhav Thackeray's 'Maharashtra Bandh' signal.
                             ------//------
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या