Subscribe Us

header ads

कृषी मालाची अवैध खरेदी करू नये,अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.illegal purchase of agricultural goods should not be done otherwise legal action will be taken.

गडचांदूर:-#farmer_news
       शेतकऱ्यांच्या हातात पीक येताच दरवर्षी अनेक दलाल व अवैध व्यापारी सक्रिय होतात. ही मंडळी खेड्यापाड्यात फिरून नगदी खरेदीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कमी दरात सोयाबीन,कापूस तसेच धान्य खरेदी करत असल्याच्या घटना घडत असल्याचे प्राप्त तक्रारीवरून कळते.आधीच निसर्गाने नागविलेला बळीराजा सोबत आता या दलाल,अवैध व्यापारी व सावकाराकडून लुटीचे प्रकार घडत असून जगाच्या पोशिंदा बळीराजाला स्वतः व कुटुंबाचे पोट भरणे कठीण झाले आहे.असे असताना शेत मालाची अवैध खरेदी करणारी सदरची मंडळी लुबाडणूक करीत आहे. "कोणत्याही व्यापाऱ्याने घरी खरेदी करू नये,कोरपना व गडचांदूर मार्केट यार्डवर बोलीद्वारे खुला लिलाव पद्धतीने खरेदी करावी" अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव के.एस.देरकर यांनी "कोरपना Live'' च्या माध्यमातून केले आहे.

  मांडवा,बोरगाव,चनई,सावलहिरा,थिपा,वरझडी,  शिवापूर,रूपापेट,दुर्गाडी,येरगव्हान,तांगाडा,हातलोणी या गावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरारी पथकाने अवैध खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केली असून 8 नोव्हेंबर रोजी 95 हजार,9 नोव्हेंबर रोजी 1 लाख 2 हजार व इतर असा सवा 2 लाखाच्या जवळपास दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई सतत सुरू असून कुणीही अवैध खरेदी करू नये,कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड अथवा उपबाजार आवार गडचांदूर येथे विक्रीसाठी आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.
illegal purchase of agricultural goods should not be done otherwise legal action will be taken.
                        -------//------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ आली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या