Subscribe Us

header ads

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 'धक्के पे धक्का' In Chandrapur district, NCP Congress is in shock after shock.!

चंद्रपूर:-#Korpanalivenews.#NCP Congress news.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष "ग्रामीण" राजेंद्र वैद्य यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला.या धक्क्यातून कार्यकर्ते सावरत असतानाच लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठवून दुसरा धक्का दिला.या दोन धक्क्यांमुळे कार्यकर्त्यांची अवस्था बघेनाशी झाली असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.
मागील 2004 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे राजेंद्र वैद्य यांना लवकरच पक्षातील वरिष्ठांनी चंद्रपूर जिल्ह्याची धुरा सोपवली.2014 मध्ये संदीप गड्डमवार यांना जिल्हाध्यक्ष पद सोपविण्यात आले.परंतू 2019 च्या विधानसभा निवडणूकीत गड्डमवार यांनी शिवबंधन बांधल्यामुळे(शिवसेनेत प्रवेश)वरिष्ठांनी वैद्य यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली.तेव्हापासून आतपर्यंत वैद्य जिल्हाध्यक्ष पदावर कायम होते.NCP President Chandrapur "rural" असे असताना मात्र पक्षात,पक्षांतर्गत गटबाजी सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.तसेच शहर,युवक व जिल्हा कार्यकारिणी यांचे गट सामान्य जनतेच्या निदर्शनास आले.याकाळातही वैद्य यांनी जिल्ह्याची धुरा जबाबदारीने सांभाळली.
परंतू पक्षातील कार्यकर्त्यांच्या नियुक्तीसाठी विश्वासात घेतले जात नसल्याने वैद्य यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना बढती देत प्रदेश कार्याध्यक्ष पद सोपवले,तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदी फैय्याज शेख यांची वर्णी लावली.त्यामुळे आपल्याला विश्वासात न घेता पदे सोपविण्यात आली तसेच आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे वैद्य नाराज झाले.त्यामुळेच कदाचित त्यांनी अचानक, तडकाफडकी पक्षश्रेष्ठीकडे पदाचा राजीनामा दिल्याचे अंदाज बांधले जात आहे.
              ''राजीनामा दिला,पक्ष सोडणार नाही."
राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके सर्व सामान्य कुटंबातील आहे.कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली.स्वतःला पक्षासाठी झोकून दिले.सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी हिरहिरीने प्रशासनासमोर मांडले.त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने पार पडली.त्यांच्या या प्रामाणिक कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीमो शरद पवार यांनी कौतुक सुद्धा केले आहे.परंतू त्यांनीही अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नाही,त्या असेही म्हणाल्या.जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका समोर असतानाच वैद्य आणि बेबीताई यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे.आता या प्रकरणी यापुढे कय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
In Chandrapur district,NCP Congress is in shock after shock.!
                           --------//-------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या