गडचांदूर:-@MP Balu Dhanorkar.
कोरपना तालुक्यातील औद्योगिक परिसर म्हणून ओळख असलेल्या आवाळपूर,नांदा व जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे खासदार बाळू धानोरकर यांनी सदिच्छा भेट देऊन गावातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.Goodwill visit of MPs to District Smart Village Bibi, Awalpur and Nanda Village.परिसरात अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर,पैनगंगा कोळसा खान येथील मानवतार सिंग कंपनी,महालक्ष्मी कंपनी या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार न देता बाहेरच्या लोकांना कामावर घेतल्याने स्थानिक बेरोजगारांमध्ये नाराजी आहे.ही नाराजी खा.बाळु धानोरकर यांच्या जवळ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.तसेच गावातील पांदण रस्त्यांच्या फार मोठ्या समस्या असून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सीएसआर CSR निधीतून व त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करून पांदण रस्ते कसे पूर्ण करता येतील,यासाठी जिल्हाधिकारीकडे अल्ट्राटेक,माणिकगड,अंबुजा व दालमिया या चारही सिमेंट कंपन्यांची बैठक लावून तो प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच जास्तीत जास्त स्थानिक युवकांना जिल्ह्यातील कंपन्यांनी प्राधान्य द्यावे यासाठी सुद्धा बैठक लावणार असल्याचे खा.धानोरकर यांनी सांगितले.परिसरातील मिरची पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून जंगली जनावरांचा पिकांमध्ये हैदोस वाढलेला आहे. त्यावर सुद्धा मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.धानोरकर यांनी म्हटले.
यावेळी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे,आवाळपूर येथील जनार्दन डाहुले,सिद्धार्थ वानखेडे,राहुल बोढे,मुन्ना मासिरकर,धोंडू चौधरी, योगेश काटकर,नांदा येथील माजी सरपंच श्यामसुंदर राऊत,अभय मुनोत,हारून सिद्दीकी,चंदू राऊत,सुनिल ढवस,दशरथ राऊत,सचिन बोढाले,महेश राऊत, अरविंद इंगोले,बिबी ग्रा.पं.सरपंचा माधुरी टेकाम, आनंदराव पावडे,बापूजी पिंपळकर,श्रावण चौके, साईनाथ कुळमेथे,शामकांत पिंपळकर,जयराम ढेंगळे, उदय काकडे,रविंद्र देरकर सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिक उपस्थित होते.Industries should give priority to local unemployed - MP Balu Dhanorkar
-------//-------
0 टिप्पण्या