Subscribe Us

header ads

विदर्भाच्या पंढरीत यात्रेच्या पार्श्वभूमीवर आ.जोगवारांकडून उपाययोजनांची पाहणी. Inspection of measures taken by MLA Jorgewar in the background of Vidarbha's Pandhari Yatra.

गडचांदूर:-#Korpanalivenews.
   कार्तिकी एकादशी निमित्त "विदर्भाची पंढरी" मानली जाणारी वढा,येथे भरणार्‍या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वढा येथील "गुरुदेव सेवा मंडळ" तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली.wadha fair mela kishor jorgewar clean campaign inspection.
यावेळी वढा ग्रामपंचायत सरपंच किशोर वराडकर,सदस्य संजय निखारे,विचोडाचे उपसरपंच ऋषभ दुपारे,माजी सरपंच धनराज ठाकरे सह यंग चांदा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राकेश पिंपकळर, धनराज हनुमंते,विजय मत्ते,पियुष भोगेवार,आदित्य निकुरे,तृप्तेष माशिरकर,राहूल त्रिंबके आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रा भरणार असून प्रशासनाच्या वतीने याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.गेल्या 2 वर्ष कोरोनामूळे यात्रा भरली नव्हती मात्र यंदा भव्य अशी यात्रा भरणार असल्याचे चित्र दिसत आहे.यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. दरम्यान याठिकाणी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे कौतूक ही आ.जोरगेवार यांनी केले.
  वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहो.येथील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून पूढेही विदर्भातील या पंढरपूरचा विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असणार आहे.तसेच यात्रेसाठी ग्रामपंचायत स्तरावर उत्तम काम सुरू असून प्रशासकीय स्तरावरही याबाबतचे उत्तम नियोजन करण्याच्या सुचना केल्याचे आमदार जोरगेवार यांनी ग्रामस्थांना सांगितले.स्वच्छता मोहिमेत गुरदेव सेवा समितीच्या सेवकांसह ग्रामवासीयांनी मोठ्यासंखेने सहभाग नोंदवला होता.
Inspection of measures taken by MLA Jorgewar in the background of Vidarbha's Pandhari Yatra.
wadha fair mela kishor jorgewar clean campaign inspection.
                          -------//-------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या