Subscribe Us

header ads

महिलांचा अपमान करणाऱ्या सत्तारांची हकालपट्टी करा. Mahilanncha apaman karanarya sattaranchi hakalapatti kara. 'डी.के.आरीकर'

चंद्रपूर:-#Political News
महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात.8 नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे माध्यमानशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरून अश्लील शब्दात शिवीगाळ केली. बिनडोकपणाचे विधान करून खा.सुप्रियाताईंचा नाही तर संपूर्ण महिला जगताचा अपमान केला.सत्तरांचे हे कृत्य व वक्तव्य मंत्री पदावर राहण्या लायकी नसल्याचे यावरून सिद्ध होते.म्हणून कृषि मंत्री पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे जिल्हाध्यक्ष,दलित मित्र,आदिवासी सेवक डी.के.आरीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करून "अब्दुल सत्तार,महाराष्ट्राचा गद्दार" अशा घोषणा देण्यात आल्या.Mahilanncha apaman karanarya abdula sattaran̄nchi hakalapatti kara.अब्दुल सत्तरांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या डोक्यात व अंगात सत्तेची हवा गेल्याचे दिसते.परंतू आमच्या नेत्यांवर नीच व गलिच्छ शब्दात टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही असेही डी.के.आरीकर म्हणाले.अब्दुल सत्तारांची भाषा हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे.तर ज्या महिलांचे या महाराष्ट्रासाठी व देशासाठी फार मोठे योगदान आहे त्या राजमाता जिजाऊ,राष्ट्रमाता सावित्रीबाई यांचा सुद्धा अपमान आहे असेही आरीकर यांनी सांगितलं.अब्दुल सत्तारांनी आपल्या घाणेरड्या वक्तव्याबद्दल खा.सुप्रियाताईंची जाहीर माफी मागावी आणि स्वतःहून कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही अशीही मागणी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी.के.आरीकर,प्रदेश उपाध्यक्ष ऍड.हिराचंद बोरकुटे,युवकांचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर,शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड,शहर महिला अध्यक्षा शालिनी महाकुलकर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,अभिनव देशपांडे, कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,दिनेश एकवणकर, राहुल देवतळे,सांबा खेवले,शिल्पा कांबळे,प्रवीण जुमडे,ओमप्रकाश येगलवार,सुधाकर मोकदम,अस्विनी तालपल्लीवर,महेंद्र शेरकी यांची उपस्थिती होती.
Mahilanncha apaman karanarya sattaranchi hakalapatti Kara.
                           -------//------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या