Subscribe Us

header ads

गडचांदूर शहर कार्यकारिणीसाठी 'वंचित बहुजन आघाडीची बैठक.Meeting of 'Vanchit Bahujan Aghadi' for Gadchandur City Executive.

गडचांदूर:-@Vanchit Bahujan Aghadi.
   वंचित बहुजन आघाडी गडचांदूर शहर कार्यकारिणी गठित करण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाणे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकाध्यक्ष मधुकर चुनारकर यांच्या अध्यक्षतेखाली गडचांदूर येथे कार्यकर्ता बैठक पार पडली.यामध्ये कार्यकारिणी व शहरातील मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यकर्त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले.अंतीम निर्णयासाठी हे फॉर्म प्रदेश समितीकडे पाठवून शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.अशी माहिती तालुकाध्यक्ष चुनारकर यांनी दिली आहे.यावेळी साजीद शेख,विक्की खाडे, विजय जिवने समाधान सोनकांबळे,सुरज ताडे,पिंटु रामटेके,सचिन सोनटक्के यांच्यासह शहरातील विविध प्रभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Vanchit Bahujan Aghadi.
Meeting of the 'Disadvantaged' for Gadchandur City Executive.
                         ------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
         मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या