गडचांदूर:-@Korpanalivenews.
राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 25 नोव्हेंबर रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे जयंती,सुधीर मुनगंटीवार सत्कार सोहळा,नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सत्कार कार्यक्रमासाठी जीवतीकडे जात असताना गडचांदूर येथील नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दरम्यान विवीध समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.त्यातील मुख्य म्हणजे येथील अमलनाला रोड प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी वास्तव्यास असलेली अतिक्रमित जागा आणि बांधकाम नियमाकुल करणे संदर्भातील निवेदन !
Mungantiwar of those encroachment holders in Gadchandur.
दिलेल्या पत्रानुसार सविस्तर असे की,सन 1970 पासून काही कुटुंब येथील प्रभाग क्रमांक 7 अंमलनाला रोड वरील जागेवर वास्तव्यास आहे.गरीबी आणि हलाकीच्या परीस्थितीला तोंड देत मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करीत असून या जागेवर बहुतांश दलीत,आदिवासी,भटक्या विमुक्त समाजातील परिवार राहत आहे.अतिशय बिकट परिस्थितीतुन दिवस काढत परिवाराची काळजी घेत मुलांना शिक्षण देत आहे.याठिकाणी यांना सर्व सुविधा उपलब्ध असून यांनी सरकारी अतिक्रमित जागेचा दंड 1981,82 ते 2001,2 मध्ये महसूल विभागात भरले आहे.तसेच पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.सदर जागेचा कर गेल्या 40 वर्षापासून ग्रामपंचायत ते नगरपरिषदेत भरत आहे.नमुना 8 सुद्धा देण्यात आला आहे.काहींना घरकुलाचा लाभही मिळाला.असे असताना काही दिवसापूर्वी शासनाने यांना जागा रिकामी करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहे.सर्व काही सुरळीत चालू असताना हे संकट ओढावल्याने डोक्यावरील छप्पर जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. शहरातील लोकसंख्या वाढल्याने जागेचे दर गगनाला भिडले.लाखोंचे प्लॉट खरेदी करायचे तरी कसे ? हाच मोठा प्रश्न आहे.शासनाच्या हालचाली बेघर करण्याच्या विचारात दिसत असून सदर जागा आणि जागेवरील बांधकाम नियमाकुल करून द्यावी,काहींना राहण्यासाठी पक्की घरे नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत त्यांना घरकुलाचा लाभ घ्यावा अशी विनंती वजा मागणी त्या क्षेत्रातील अतिक्रमितांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मुनगंटीवार यांनी याची त्वरित दखल घेऊन परीस्थिती सध्या जैसे थे ठेवण्याचे संबंधित विभागाला म्हटल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून पुढे यासंदर्भात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Mungantiwar of those encroachment holders in Gadchandur.
-------//------
0 टिप्पण्या