Subscribe Us

header ads

दिव्‍यांग मुलांचा संगीतमय कलाविष्‍कार.#Musical creativity of children with disabilities

चंद्रपूर:-#Korpanalivenews.
 देववाणी दिव्‍यांग बहुउद्देशिय संस्‍था चंद्रपूर संस्थेच्या माध्‍यमातून "गंध फुलांचा" Gandh phulannch हा दिव्‍यांग मुलांचा संगीतमय कलाविष्‍कार 5 नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी 6 वा.चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी नाटयगृह येथे आयोजित करण्‍यात आला आहे. Musical creativity of children with disabilities.
      बाल कल्‍याण संस्‍था पुणे येथील दिव्‍यांग कलावंत या कार्यक्रमात आपली गायन व वादन कला सादर करणार आहे.चंद्रपूरचा रहिवासी असलेला देवांशु राकेश शिंगरु हा तबला वादक तसेच त्याचे गुरू दत्तात्रय भावे पुणे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार,काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्‍हाध्‍यक्ष रितेश (रामू)तिवारी,ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे आणि कौस्तुभ आमटे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली आहे.
      दिव्‍यांग मुलांच्‍या या कलाविष्‍काराला चंद्रपूरकर रसिकांनी आपली हजेरी लावून कलेचा लाभ घ्यावा असे आवाहन देववाणी दिव्‍यांग बहुउद्देशिय संस्‍था चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले.
#Musical creativity of children with disabilities.
disabled artists will present their singing and playing skills in this program
                           ------//------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ आली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या