मुंबई:-#NCP aggressive.
शिंदे गटातील आमदार आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ भाषेचा वापर केल्याने त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.सत्तारांच्या या अभद्र वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.NCP aggressive.दरम्यान त्यांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे.यात मुंबईतील अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलन केले आहे.यावेळी आंदोलकांनी सत्तारांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.या दगडफेकीत सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फुटल्या आहे.यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक दिसले.

आंदोलकांनी पुन्हा सत्तारांविरोधात "50 खोके एकदम ओके'' अशी घोषणाबाजी सुरू केली.यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ करत त्यांच्या फोटोंना काळं फासत,जोडे मारो आंदोलन केले.NCP protesters aggressive against Abdul Sattar.
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले.यावेळी सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे.

दरम्यान हे प्रकरण आता चांगलचं तापल असून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तारांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आम्ही जिजाऊच्या लेकी आहो. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र बघितला आहे.अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.सत्तारांना अशाप्रकारे विधान करताना लाज वाटली नाही का ? अशी घणाघाती टीकाही विद्या चव्हाण यांनी केली आहे.
NCP is aggressive against Abdul Sattar's statement.
-------//-------
0 टिप्पण्या