Subscribe Us

header ads

स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारीणी गठित.New Executive Committee of Swayambhu Divyang Multi-Purpose Organization constituted.

   गडचांदूर:-@Worldwide Disability.
    गडचांदूर स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेची नवीन कार्यकारीणी 7 नोव्हेंबर रोजी आयोजित एका छोटेखानी बैठकीत गठित करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध घातले होते.आता मात्र सर्वकाही पुर्वी सारखे झाले आहे.त्यामुळे यंदा 3 डिसेंबर रोजी येथील दिव्यांग disabled बांधवाणी 'तालुका स्तरीय जागतिक अपंग दीन' मोठ्या उत्साह व जल्लोषाने सहरा करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.या संदर्भात चर्चा करून स्वयंभूच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांमार्फत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सतीश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंभूचे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
   यामध्ये अध्यक्ष पंकज मानुसमारे,उपाध्यक्ष नितीन सपकाळ,सचिव प्रमोद मोहूर्ले,सहसचिव पवन येंगुर्तीवार,कोषाध्यक्ष राजलक्षमी वर्भे,सहकोषाध्यक्ष सरोज मडावी,संघटक सुरज बार,सहसंघटक वाजीद तर मंजूनाथ शेगोकर,किशोर आत्राम,ममता निशाद, अमोल दाते,वारलू साठवणे,विशाल शेंद्रे,नारायण शेंडे आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. कोरपना,जिवती तालुक्यातील सर्व दिवांग बांधवांनी येत्या 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वजता गडचांदूर येथील गांधी चौक येथे उपस्थित राहावे.तिथून 11 वाजता रॅलीची सुरूवात होऊन माता मंदिर जवळ समापन होईल व पुढील कार्यक्रमात सर्व दिव्यांग बाधवांची सदस्य नोंदणी केली जाईल.
              "सोबत आणायची कागदपत्रे"
                      👇👇👇👇👇
दिव्यांग प्रमाणपत्र,आधार कार्ड,जन्म दाखला,राशन कार्ड,दोन फोटो,उत्पन्न दाखला(जुना चालेल)दोन झेरॉक्स प्रगतीमध्ये द्यावी.अधीक माहितीसाठी संस्थाध्यक्ष पंकज मानुसमारे मो.91921730828, सचीव प्रमोद मोहुरले मो.919420304152,
संघटक सूरज बार मो.919325390351 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान संस्थापक सतीश बिडकर यांनी केले आहे.
New Executive Committee of Swayambhu Divyang Multi-Purpose Organization constituted.
                           -------//-------
  मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या