Subscribe Us

header ads

हे देवा..!विद्यार्थ्यांचा वनवास संपणार कधी ?O God When will the Exile of the students end ?

गडचांदूर:-@ST buses problem.
          गडचांदूर शहरात अनेक शाळा-महाविद्यालय असल्याने परिसरातील गावखेड्यातून शेकडो विद्यार्थी दररोज महामंडळाच्या बसेसने याठिकाणी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येतात.परंतु वेळेअभावी चालत असलेल्या बसेसमुळेे यांच्या शिक्षणाचे अक्षरशः तीनतेरा वाजत आहे.राजूरा आगारातील बसेस रामभरोसे चालत असल्याने लहानमोठ्या शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना मोठ्याप्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.शाळा सुटल्यावर जवळपास 2,3 तास निव्वळ बसच्या प्रतिक्षेत यांना ताटकळत बसावे लागत आहे. बसेसच्या वेळापत्रकात अनियमितता असल्याने अनेक ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहचायला उशीर होतो.यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मुलांना मोठ्याप्रमाणात शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. एकीकडे शासनाचा नारा आहे की ''बेटी बचाव,बेटी पढाओचा'' मात्र दुसरीकडे अनेक बेटींना अशा प्रकारे शिक्षणासाठी वनवास भोगावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. deva..!Vidyarthyannchaa vanavas sampanar tari kadhi ?
   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्या सुरु केल्या,मात्र हल्ली त्या कुठेही दिसत नाही.एकतर बस वेळेवर येत नाही आणि आली तर बसायला सिट नाही.दरवाज्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो.यामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून "हातात पास,तरीही जीवघेणा प्रवास" अशा परिस्थितीचा सामना सगळेच विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.अनेक गावात बसेस वेळेवर पोहचत नसल्याने शाळेला उशीर होतो आणि उशीर झाल्यास शिक्षक ओरडतात.या भीतीने कित्येक विद्यार्थी सायकल किंवा इतर खासगी वाहनाने जीवाचे रान करत शाळेत येतात.
एकतर बस वेळेवर येत नाही,आलीच तर विद्यार्थ्यांची गर्दी पाहून बस चालक,वाहक अपमानास्पद वागणूक देतात.शाळेच्या वेळेस सुटणाऱ्या बसमध्ये इतर प्रवाशांचीच गर्दी राहत असल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.बस मधील गर्दीमुळे विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरल्याची घटना सुद्धा पुर्वी घडल्याची माहिती असून बस आल्यानंतर अनेक विद्यार्थी सीट पकडण्यासाठी खिडकीतून दफ्तर टाकतात अशावेळी सुद्धा अपघात घडले आहे. ''बस एक विद्यार्थी अनेक'' अशी अवस्था असून या सर्व बाबींकडे राजूरा आगार प्रमुखाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.अनेकदा निवेदने देऊन,आंदोलन करूनही परिस्थितीत बदल घडत नसल्याचे पाहून ''अहो साहेब, विद्यार्थ्यांचा वनवास संपणार तरी कधी'' आशी विचारना केली जात आहे.लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन समस्या दूर करण्याची गरज असताना त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. आजच्या युगातही जर शिक्षणासाठी ऐवढा त्रास सहन करावा लागत असेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Deva..!Vidyarthyannchaa vanavas sampanar tari kadhi ?
                           -------//-------
  मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या