गडचांदूर:-#Children's Day.
आधुनिक भारताचे निर्माते,माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनाचे(बालक दिन) Children's Day. औचित्य साधून सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे फ्रेंड्स चारिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या Friends Charitable Trust Chandrapur वतीने 'बुट' व विद्यालयाच्या वतीने 'गणवेश वितरण' कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सरिता मालू ,अरविंद धिमन,मीनाक्षी करिये, मुख्याध्यापक धर्मराज काळे,शुभम गोविंदवार, इम्रान,करण कोलगुरी इत्यादींची उपस्थिती होती. 

अध्यक्ष स्थानावरून विचार मांडताना डॉ.अडबाले यांनी 'दानाचे' महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सरिता मालू यांनी आपल्या भाषणातून गरजू विद्यार्थी व समस्याग्रस्त व्यक्तींना मदत करण्याची वृत्ती अंगीकारावी,या पवित्र कार्याला जोपासून पुढील आयुष्यात वाटचाल करावी तसेच मोबाईलचा योग्य वापर करावा असा संदेश दिला.प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू कथन करताना सामाजिक बांधिलकी जोपासून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन पुढे नेण्याचे कार्य प्रत्येकाने करावे अशी आशा व्यक्त केली.तसेच स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यामुळेच आधुनिक भारताचे स्वप्न साकार होत आहे.आज जी भारताची प्रगती दिसत आहे,यात पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीकोणाचा प्रत्यय दिसून येतो.त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया Discovery of India हा ग्रंथ भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक माहितीची खाण आहे.विद्यार्थ्यांनी या थोर महापुरुषांकडून विचार प्रवृत्त व्हावे असा आशावाद व्यक्त केला.

बालक दिनाच्या औचितसाधून विद्यालयातील 30 विद्यार्थ्यांना बूट व गणवेशाचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक वृंद उपस्थित होते.संचालन सेवाजेष्ठ शिक्षक महेद्रकुमार ताकसांडे,आभार कु.भुवनेश्वरी गोपंमवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चटप मॅडम,पाटील सर,मरसकोल्हे सर,श्रीमती शेंडे मॅडम,उमरे मॅडम, लिलाधर मत्ते,शशिकांत चन्ने,सुभाष टेकाम व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
'Distribution of uniforms and shoes' on the occasion of Children's Day.
The program ended with the National Anthem.
--------//-------
0 टिप्पण्या