Subscribe Us

header ads

प्रा.दिनकर झाडे राज्यस्तरीय 'साहित्य गंध' पुरस्काराने सन्मानित.Prof.Dinkar Zade was honored with the State Level Literary Gandha Award.

गडचांदूर:-#State Level Literary Gandha Award.          
    मराठी भाषा सक्षमीकरण "एकच ध्यास'' असलेल्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर येथील प्रा. दिनकर झाडे यांना राज्यस्तरीय साहित्य गंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यांचे साहित्यातील विविध प्रकारातील लेखन विचारात घेऊन 3 नोव्हेंबर 2022 रोजी लातूर नगरीत संपन्न झालेल्या "राज्यस्तरीय साहित्य गंध पुरस्कार 2022" मध्ये मानाचे वस्त्र,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,मेडल आणि साहित्यगंध दीपोत्सव अंक 2022 देऊन प्रा.दिनकर झाडे यांचा 'सपत्नीक सत्कार' लातूरचे माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड,मराठीचे शिलेदार संस्थेचे संस्थाध्यक्ष राहूल पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव गादेकर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.                         
     सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड सिलवासाच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता पाटील ठाकरे होत्या तर जेष्ठ साहित्यिक डॉ.माधव गादेकर तसेच मार्गदर्शक सुधाकर भुरके(नागपूर),राज्यस्तरीय कवीसंमेलनाध्यक्षा शर्मिला देशमुख(बीड),संस्थेचे सर्वेसर्वा राहुलजी पाटील तसेच जेष्ठ कवी नागोराव कोंपल्लीवार यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
          राज्यस्तरीय सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय संग्राम कुमठेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य परीक्षक मुख्य संपादक असलेल्या सौ.वैशालीताई अंडरस्कर मॅडम(चंद्रपूर)यांनी मानले प्रा.दिनकर झाडे हे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कार्यरत असून मराठी व अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहे.मराठी साहित्यातील विविध प्रकारचे लेखन करून मराठी भाषेच्या संवर्धन,संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी मोलाचे कार्य करीत आहे.त्यांना हा "राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार 2022" दिला असून परिसरात त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Prof.Dinkar Zade was honored with the State Level Literary Gandha Award.
                         -------//-------
 मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या